|
न. १ हृदय ; मन ; अंतःकरण . २ काळीज ; छाती . [ सं . ] वि. घेऊन जाणारा ; हरून नेणारा ; समासांत उपयोग . उदा० दुःख - पाप - प्राण - हृत् . [ सं . हृ ] ०कंप पु. छातीचें , काळजाचें धडधडणें . ०कमल पिंड - उ . हृदय . ०कोश पु. १ हृदयावरचें आवरण . २ हृदय व त्याचे आवरण , एकत्रपणें . ०ताप संताप - पु . हृदयाचें दुखणें ; दुःख , त्रास , पश्चाताप इ० ची मनास लागलेली टोंचणी . हृदाकाश - पु . हृदय ; अंतःकरण . हृदाकाशीं मीपण स्फुरे जिवाशीं । हृदावर्त हृदावळ हृदावळी - हरदावळ - ळी पहा . हृदिस्पृश - वि . हृदयांतलें ; आवडतें ; प्रिय . हृद्गत - न . १ मनांतील हेतु , अर्थ , अभिप्राय . - वि . मनांत , अंतःकरणांत असलेलें , ठसलेलें . २ आवडतें ; प्रिय . ३ अंतःकरणावर खोदलें गेलेलें . हृद्य - वि . १ मना संबंधी . २ हृदयंगम ; सुंदर . ३ मनापासूनचे ; खरं ; कळकळीचें . ४ प्रिय ; आवडतें . हृद्रोग - पु . १ छातीचा रोग . २ ( ल . ) अत्यंत काळजी ; दुःख ; चिंता . हृद्रर्त - वि . छातींतील ( दुःख , रोग , शूल ) हृद्विकार - पु . १ छातीचा बिघाड ; छातीचा रोग . २ अंतःकरणाची कोणतीहि भावना , विकार , वासना . हृद्विकास - पु . अंतःकरण मोठें , उदार , कृपाशील , आनंदित असणें . हृद्विलास - पु . अंतःकरणाचा आनंद . हृत्संताप - पु . मनाचें अस्वास्थ्य ; राग ; खेद ; औदासिन्य इ० . हृन्मंदिर - न . हृदयमंदिर .
|