|
स्त्री. बाकी ; खर्च वजा जातां उरलेली रकम ; अवशेष ; शेष ( द्रव्य , धान्य , पदार्थ वगैरे ). [ अर . सल्ख् ] स्त्री. बत्ती ; सरबत्ती ; फैर . त्या वेळेस इकडून दोन शिलका म्हणजे फैरा एक क्षणांत केल्या - रा ३ . १९१ . तोफखान्याला शिलक दिली । - ऐपो २१३ . [ अर . शल्क ] शिलकणें , शिलगणें - अक्रि . पेट घेणें ; पेटणें ; आग लागणें ; चेतणें . शिलकावणें , शिलगावणें , शिलकाविणें , शिलगाविणें - सक्रि . १ पेटविणें ; आग लावणें ; चेतविणें ; बत्ती देणें . २ ( ल . ) चेतना देणें ; उठावणी देणें ; भडकविणें . शिलकावण , शिलगावण , शिलकावणी , शिलगावणी - स्त्री . १ पेटविण्याची , आग लावण्याची क्रिया . २ ( ल . ) सार्यासाठीं तगादा करावयास पाठविलेल्या मनुष्यानें स्वतःकरितां जबरीनें कांहीं रक्कम घेणें . ३ अशा प्रकारें घेतलेली रकम . ४ मुदतींत काम न केल्याबद्दल दररोज घ्यावयाचा दंड . ५ वसूल केलेला पैसा जवळ ठेवल्याबद्दल , अफरातफर केल्याबद्दल घ्यावयाचा दंड . शिलगून देणें - ( व . ) पेटविणें . स्त्री. चोय ; पत्रावळी लावण्याची कामटीची बारीक काडी . सल सिलका आणि सराटे । - दा ३ . ७ . ४ . [ सं . शलाका ] शिलकुंधा - पु . ( व . ) कुंध्याच्या मधून मधून कुठे कुठे निघणार्या शिलका , अंकुर . स्त्री. चमक ; उसण ; लचक ; कळ . ( क्रि० मारणें ). शिलका देणें - छळणें ; त्रासणें ; गांजणें ; हाल करणें . ०झाडा पु. हिशेब , जमाखर्च पुरा होऊन काढलेली बाकी . ( क्रि० काढणे ; उतरणें ). ०बंद पु. ज्या कागदावर जमाखर्च लिहून शिलक काढतात तो कागद ; आढावा ; हिशेबपत्रक ; जमाखर्चाचा तक्ता . ०बाकी स्त्री. हिशोब पुरा होऊन राहिलेली रकम . ०साखळी स्त्री. १ दररोज किंवा महिनेवार हिशेब पुरे करून काढीत आणलेली बाकीची परंपरा . २ जमाखर्च तपासून काढलेला पडताळा ; जमाखर्चाची तपासलेली तोंडमोळवणी ; बिनचूकपणा , हिशेबाची खात्रीशीर मिळवणी . ( क्रि० मिळविणें ; निसवणें ; मिळणें ; जमणें ). शिलका - वि . शेलका ; निवडक ; उत्तम ; सुंदर ; वेचक . शिलकी - वि . १ राहिलेला ; बाकी ; उर्वरित . २ संग्रहांतील ; जपून ठेवलेला ; राखीव . डागिने - पुअव . राखीव , उत्तम , उत्कृष्ट पदार्थ , वस्तु , वस्त्र - पात्र , अलंकार वगैरे .
|