|
स्त्री. बत्ती ; सरबत्ती ; फैर . त्या वेळेस इकडून दोन शिलका म्हणजे फैरा एक क्षणांत केल्या - रा ३ . १९१ . तोफखान्याला शिलक दिली । - ऐपो २१३ . [ अर . शल्क ] शिलकणें , शिलगणें - अक्रि . पेट घेणें ; पेटणें ; आग लागणें ; चेतणें . शिलकावणें , शिलगावणें , शिलकाविणें , शिलगाविणें - सक्रि . १ पेटविणें ; आग लावणें ; चेतविणें ; बत्ती देणें . २ ( ल . ) चेतना देणें ; उठावणी देणें ; भडकविणें . शिलकावण , शिलगावण , शिलकावणी , शिलगावणी - स्त्री . १ पेटविण्याची , आग लावण्याची क्रिया . २ ( ल . ) सार्यासाठीं तगादा करावयास पाठविलेल्या मनुष्यानें स्वतःकरितां जबरीनें कांहीं रक्कम घेणें . ३ अशा प्रकारें घेतलेली रकम . ४ मुदतींत काम न केल्याबद्दल दररोज घ्यावयाचा दंड . ५ वसूल केलेला पैसा जवळ ठेवल्याबद्दल , अफरातफर केल्याबद्दल घ्यावयाचा दंड . शिलगून देणें - ( व . ) पेटविणें .
|