|
उ.क्रि. ( म्हैस , मेंढी इ० जनावर , कातडें , वस्त्र यावरील केंस , लोंकर , दशा ; कापड विणतांना शिलक राहिलेले दोरे ) अंगाबरोबर कापणें ; कातरणें ; खरडून घासून काढणें ; बोडणें . ( निंदार्थी ) हजामत करणें ; केंस काढणें ( डोकें , दाढी , इतर अवयव यांवरचे ). ( ल . ) तासडपट्टी , खरडपट्टी काढणें . [ सं . भद्राकरण ] भादरपट्टी - स्त्री . तासडपट्टी ; खरडपट्टी . ( क्रि० करणें , काढणें ). हजामत . [ भादरणें + पट्टी ]
|