|
स्त्री. १ मूळ देश ; स्वदेश . २ उत्पत्तिस्थान ; मूळचा प्रदेश ( प्राणि , वनस्पति वगैरेचा ). ३ ( रूढ ) परदेश ; परकीय देश ; विशेषतः इंग्लंड , यूरोप . ४ प्रांत ; परगणा ; प्रदेश ; जनपद . तेरदळच्या विलायतीस शिवाजी तसवीस देतो . - शिचप्र ५ . विलायती खराब पडली होती . - वाडसनदा १७४ . [ अर . विलायत् ] विलायती - वि . १ परदेशी ; इंग्लंडचा ; यूरोपीय . हिंदुस्थाननें विलायती माल घेणें पातक होईल - टि ३ . २४ . २ धूर्त ; बिलंदर ; कावेबाज ; हुषार . ३ परदेशी ; चमत्कारिक ; लक्ष्यवेधक ; असामान्य ( याअर्थी कोणत्याहि विचित्र , सुंदर , अजब , कौशल्यपूर्ण वस्तूस लावतात ). ४ ( ल . ) उनाड , उंडगा , खोडकर ( मुलें ). ०ऊंस पु. एक जातीचा ऊंस . ०कोंबडा पु. टर्की ; गिनी फाउल . ०गवत घास - गिनी गवत ; लसूणघास . ०चणा पु. वाटाणा . ०चिंच स्त्री. बारीक पानांचें बारीक शेंगा येणारें एक झाड . ०थुवर पु. एक जातीचा थोर ; शेर . ०धोतरा पु. धोतर्याची एक जात . ०निवडुंग पुन . फडे निवडुंग ; बिनकाटयाचा निवडुंग . ०बाभळ स्त्री. एक विशिष्ट वृक्ष . ०मूग पु. भुइमुग . ०मुळा पु. मुळयाची एक जात . - कृषि ६१८ ०मेंदी मेंधी - स्त्री . एक वासाची , मेंदीची जात . ०वांगी स्त्री. टोमाटोचें झाड ; बेलवांगी . ०वांगें न. टोमाटो ; बेलवांगें . ०शेर पु. एक जातीचा शेर , हुरा . ०सन पु. ओरिसा , ओढया व बंगालचा कांहीं भाग यांत चालणारा एक शक . इ . स . ५९२ मध्यें सुरू झाला . सौरवर्ष व चांद्रमास .
|