|
न. हिरा , माणिक , पाच इ० मूल्यवान खनिज पदार्थ ; ( हिरा , पाचु , माणिक , पुष्कराज , नीळ , गोमेद , लसण्या , प्रवाळ इ० ). ( ल ) कोणेक जातींतील , समुदायांतील किंवा वर्गांतील रत्नाप्रमाणें उत्कृष्ट व्यक्ति . उदा० पुत्ररत्न , कन्यारत्न , अश्वरत्न , सखाराम बापू म्हणजे एक रत्न आहेत . - इंप ७१ . ( ल . ) शोभा देणारा , सौंदर्य वाढविणारा , संसार , सभा इ० स ज्याच्या योगानें शोभा येते असा पदार्थ . संसारांत मूल हें रत्न आहे . समुद्रमंथनापासून उत्पन्न झालेले चंद्र , अमृत , लक्ष्मी इ० चतुर्दश पदार्थ . ( उप . ) मूर्ख मनुष्य . इंदूर प्रजेचें दुर्दैव म्हणून हें रत्न या गादीला लाभलें . - विक्षिप्त १ . १७ . ०खचित जडित - वि . हिर , माणकें इ० रत्नें बसविलेलें ; जडावाचें ; रत्नें बसविलेला ( सोन्याचा दागिना , सिंहासन इ० ). [ सं . ] ०गुंज एक झाड . यास लांब शेंगा येतात . एकएका शेंगेंत ८।१० गुंजा असतात . मुंबईकडे सोनें , रुपें तोलावयास यांचा उपयोग होतो ; वाल . ०त्रय त्रितय - न . जैन धर्मांतील सम्यक दृष्टि , सम्यकज्ञ । न व सम्यक चारित्र्य हीं तीन अमोलिक तत्त्वें . [ सं . ] ०दीप पु. दिव्यासारखा लखलखीत प्रकाश देणारें रत्न ; स्वयंप्रकाशी रत्न ; अशा प्रकारचीं रत्नें पाताळांत असल्याबद्दलच्या कथा आहेत . ०पारखी वि. रत्नाची परीक्षा करणारा ; ज्यास रत्नांची पारख आहे असा . ०वाटी स्त्री. हिरे इ० रत्नें बसविलेलें बशीच्या आकाराचें भांडें . [ सं . ] ०सानु पु. मेरु पर्वत . [ सं . ] रत्नाकर पु . रत्नांची खाण . ( ल . ) समुद्र ( तळाशीं रत्नें असतात म्हणून ). रामेश्वरापासून अलीकडील पश्चिमेच्या आंगचा जो समुद्र तो . [ रत्न + आकर ] रत्नाकर आळविणें - पु . ( समुद्र शांत करणें ). काम न करतां ( रडत , बोंबलत ) परत येणें ; अपयश घेऊन येणें . हा रणतोंड्या खरा . जेथें कामास पाठवावा तेथून रत्नाकर आळवीत येतो . [ सं . ] रत्नाचल - पु . मेरु पर्वत . - ज्ञा १८ . ३५ . [ रत्न + अचल ] रत्नाभरण - न . जडावाचें भूषण . [ सं . रत्न + आभरण ]
|