Dictionaries | References न नीज Script: Devanagari See also: निज Meaning Related Words नीज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : रस्सी नीज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 One's own affairs. Pr. निजे वांचून पुजा नाहीं No one cares about the concerns of another.Sleep. नीज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n f Sleep. See निज. नीज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गाई - गाई , झापड , झोप , निद्रा , पेंग , वामकुक्षी , शयन , सुषुप्ती . नीज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : झोप नीज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . १ स्वतःचे काम . २ आत्मस्वरुप . छंदे आपुलिया नाचत । नीज घेऊनी फिरत गा । - तुगा ३४८ . [ सं . निज ] म्ह ० निजे वांचून पुजा नाही = दुसर्याच्या कामाची कोणी काळजी घेत नाही . स्त्री. झोंप . तदुक्तिस जन प्रभो जरि निजेमधे चावळे । - केका ७३ . [ सं . निद्रा ] निजगळ - वि . ( ना . ) झोंपाळू . निजतीक्रिया - स्त्री . प्रेत निजल्या स्थितीत पुरणे .- बदलापूर १७२ . निजणे - अक्रि . १ झोंप घेणे ; झोंपणे . टपकण निज . महारपोर रात्र शिळी करतील . ( लहान मुलाला लवकर निजविण्यासाठी म्हणतात . ) २ आडवे होणे ; कलणे ; लोळणे . ३ आजारी पडणे ; हांतरुणाला खिळणे . ४ ( ल . ) मरणे . ५ नाश पावणे ; बुडणे ; नाहींसा होणे . ( धंद्यातील भांडवल , धंदा , व्यापार इ० ). ६ भरभराटीस न येणे ( दैव ); मंद चालणे ( कामधंदा ); नाहींसा होणे ( हुकमत , अधिकार ); बेचिराख , उजाड होणे ( घर , गांव ). ७ संभोग करणे . निजलेला मेल्यासारखा - मृतवत निजलेला व मेलेला सारखाच . निजल्या जागी विकणे - कारवाईने आपले काम साधणे ; बोटावर नाचविणे . निजून उठणे , उठत असणे - ( पहांटेस , लवकर )- प्रातःकाळी झोंपेतून उठणे किंवा उठण्याची संवय असणे . सावकाश निजणे - शांतपणाने झोंप घेणे ; बेफिकीरपणे झोंपणे . निजविणे - सक्रि . झोंपविणे ; दुसर्याला झोंपू देणे आडवे पसरविणे ; निजावयास लावणे . निजसुरा - वि . अर्धवट झोंपलेला अर्धवट जागा ; असावध . जेणे देहात्मवादी निजसुरा । - यथादी १ . ३८२ . निजानीज - स्त्री . सामान्यपणे निजणे ; सर्वत्रांचे निजणे ; शांतता ; सामसूम . निजायाबसायाजोगी - वि . ( बायकी ) घरकाम करण्यास योग्य झालेली , वयांत आलेली ( स्त्री . ) निजाळू - वि . झोपाळूं ; फार , नेहमी झोंप घेणारा . निजेला - वि . निजलेला ; झोंपलेला ( माणूस ). निजल्यामधे पुछ्य ते लोळताहे । - राक १ . ३३ . त्यांतील एक कलहंस तटी निजेला । - र ९ . स्त्री. ( काव्य ) झोंप ; निद्रा . ज्याचा त्रयोदशाब्द न लागोंदे नीज धर्मपुत्रास । - मोकर्ण ६ . ५९ . निजेल्या पर्यंकी किमपी न लगे नीज नयनी । - सारुह ५ . १३३ . [ सं . निद्रा ; हिं . नींद ]०मोड नीदमोड - स्त्री . झोंपमोड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP