|
पुस्त्री . ( कु . ) घराचे जोते इ० कांची कड . स्त्री. १ विवक्षित वजनाचे , शेरांचे माप . हे निरनिराळ्या ठिकाणी भिन्नभिन्न वजनाचे असते . २ मण इ० प्रमाणांचा करुन ठेवलेला दगड इ० ; धडा अर्थ ३ पहा . ३ ( जरतारी धंदा ) धडा अर्थ ७ पहा . ४ वजन करण्याचा कांटा ; तराजू . सज्जन कसाई मांस विकिता । त्याची लाविसि धडी । - दत्तपदे ४७ . [ सं . धट = ताजवा ; हिं . सिं . धडी = पांचशेरी ] धडीने पैसा मोजणे - श्रीमंतीस पार नसणे ; पैशांत लोळणे ; अलोट पैसा बाळगणे . स्त्री. १ धोतर , लुगडे इ० वस्त्राचा रेशीम , जरतार इ० कांचा कांठ , किनार , लुगड्याची धडी रुंद आहे . २ ( ना . ) छपरी ; पडवी ; पडवीचा कांठ . ३ चिंधी . स्त्री. एक तुकडा , भाग . २ ( डोंगरांतील ) घाट ; बारी . आली सातपुड्याची धडी तोफगाडी दाटली घोडी । - ऐपो ४३३ . [ धडा ] ०पगडी स्त्री. ( व्यापक . ) सभा , समारंभ इ० प्रसंगी पुरुषाने घालावयाचा शेला , पागोटे इ० पोषाख . [ धडी + पगडी ]
|