Dictionaries | References

जितरब

   
Script: Devanagari
See also:  जितराब , जित्रप , जित्रब

जितरब     

 न. जीवनाला आधार असें जमिनीचें उत्पन्न , श्रम करणारा प्राणी ; पिकलेलें उभें शेत ; बागाईत व तें करणारीं ( घोडा , बैल , गाढव , गाय , रेडा म्हैस इ० ) जनावरें . माझें जितराब यंदा बुडालें त्यामुळें मी खराबीस आलों . घोडयाचें जितरब एकदां मोडलें म्हणजे कामांतून जातें . जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरी उत्तम म्हणोन घोडीं सोडलीं . - भाब ९१ . [ जीत = जिवंत + राब ] म्ह० कांद्याचें कोरडयास , मानभावाची बायको आणि गाढवाचे जितरब यांत श्रम नाहीं .

जितरब     

कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको आणि गाढवाचे जितरब यांत श्रम नाहीं
कांद्याचे तोंडी लावणें करावयास श्रम लागत नाहीत तो नुसता चिरून दिला म्‍हणजे झाले
त्‍याप्रमाणेच महानुभावास आपली आपली बायको पोसावयाचे श्रम पडत नाहीत
कारण याच्याप्रमाणें तीहि काम करून भिक्षा मागून आणून आपला निर्वाह करते. त्‍याचप्रमाणें गाढव घरी बाळगले तरी त्‍यास खावयास घालावयाची काळजी नसते, काम झाल्‍यावर त्‍यास मोकळे सोडले म्‍हणजे उकिरडा फुकून वगैरे ते आपले पोट भरते. याप्रमाणें या तीन वस्‍तु बाळगण्यास अगदी सुलभ असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP