Dictionaries | References

उगाणा

   
Script: Devanagari
See also:  उगाना

उगाणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. संताचे अवगुण आणितां पैं मना ॥ केलासे उ0 सुकृताचा ॥

उगाणा

  पु. उपदेशपर भाषण ; उलगडा ; स्पष्टीकरण . नाना प्रमेयांचे उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणेंबोलों लाहाती । - ज्ञा ७ . १९८ . [ उगवणें ]
  पु. कारकून ; हिशेबनीस ; उग्राणी करणारा . सरिसा उगाणा कोठी , चाटे बहुवे तैसे निगाले । - ऋ १३२ . [ सं . उदग्रहण ; प्रा . उग्गाहण = तगादा ; परत मागणें ]
  पु. 
   दातव्य ; बयाणा ; विसार . आचाराचा उगाणा जी कवणासि दिधला . - भाए १०९ .
   गणना ; झाडा ; परीक्षा ; हिशोब . तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी । - ज्ञा ७ . १२९ . नाणीं कांहीं मना । करुनी पापाचा उगाणा । - तुगा ५५७ .
   मुक्तता ; सोडवणूक . तुवावीण योगिया उगानावेढा कवण करील । - भाए १०५ .
   कर्जाऊ रकमेची फेड ; तोंडमिळवणी . बहिणी म्हणे मना हेतूंचा उगाणा । करुनि निर्वाणा पहातसे । - ब १२९ . कीं होय उगाणा - राला ३८ .
   चव ; रुचि ; अनुभव . रसवृत्तीसी उगाणे । घेऊनि जिव्हाग्र शहाणें । - अमृ ६ . ९० . मानावमाना समदृश्य उगाणा । - देप १६ .
   नाश ; नागवण . कोप येतांच जाणाकरी उगाणा तपाचा । - एभा ४ . ७८ . २३ . ६५९ .
०काढणें   ( बायकी ) कोणतेंहि धान्य कांडतांना अगर कुटतांना उखळांत खालीं राहिलेला जिन्नस वरचेवर खालचा वरवरचा खालीं करणें . [ उद + ग्रहण ]

उगाणा

   उगाणा काढणें
   धान्य कांडतांना किंवा कुटतांना उखळात खाली न कांडता राहिलेला भाग वरखाली करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP