-
मुसळी, कुल,ऍमारिलीडेसी
-
मुसळी, घायपात, नार्सिसस, कुमूर, नागदवणा इत्यादी एकदलित वनस्पतींचे कुल. या कुलाचा अंतर्भाव केसर गणात (इरिडेलीझ) बेसींच्या पद्धतीत केला असून हचिन्सन यांनी मुसळी गणात (ऍमारिलिडेलीझ) केला आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे- कंद, दृढकंद प्रकारचे खोड, मूलज पाने, फुलोऱ्यास प्रथम महाछदाचे आवरण, परिदले सहा, खाली नळीसारखी व वर सुटी, सहा केसरदले, अधःस्थ, तीन कप्यांचा व अनेक बीजकांचा किंजपुट, मृदुफळ किंवा बोंड इ.
Site Search
Input language: