-
पु. ( काशी ) तंगडी ; पाय . [ प्रा . दे . हिं . ]
-
न. १ षडरसांतील मधुर रस . २ ( व . खा . ) मीठ . वरण अलोणी झालें गोडाशिवाय बरें लागत नाहीं . [ तुल० सं . मिष्ट - मीठ ] ३ ( वैद्यक ) पथ्याला अनुसरून मधुर किंवा साखरेनें युक्त असा पदर्थ त्या औषधास गोड वर्ज्य . - पु . ( गो . कों . ) गुळ . - वि . १ मधुर ( आंबट , तिखट , खारट नव्हे असें ); स्वादिष्ट . २ सुवासिक . ३ मंजुळ ; सुंदर ; साजिरे . ४ मृदु . ५ सौम्य . ६ सुखकारक ; संतोषदायक . मनास गोड वाटत नाहीं . ७ नीटनेटकें ; नियमित ; योग्य ; चांगले ; शुध्द ( भ्रष्ट नसलेलें ). जसें :- गोड - प्रयोग - उदाहरण - वाक्य - कवन इ० ८ ( तंजा . ) चांगलें ; सुरस , चवदार . चटणी गोड आहे . ९ औरस ( लग्नाच्या स्त्रीची ) संतति ; हिच्या उलट कडू ( दासीपुत्र - कन्या ). १० शुभदायक ; मंगलकारक . सत्वाचा गोड जाहला अंत । - विक ८ . [ सं . गुड ; प्रा . गोडु ; फ्रें . पो . जि . - गुडलो , गोळास ] ( वाप्र . ) करून घेणें - कसेंहि असलें तरी गोडीनें , चांगल्या हेतूनें स्वीकारणें ; मान देणें ; अव्हेर न करणें . गोड गुळचट - अतिशय गोड . दिल्हें घेतलें गोड - मिळून मिसळून वागणें चांगलें .
-
०वणें गोडावणें - सक्रि . १ गोड करणें ; होणें , खारट , आंबट नाहीसें करणें ( जमीन , पाणी , फळें इ० ) २ मिठ्ठी बसणें ( गोड पदार्थ खाल्ल्यानें जिभेस ). ३ ( काव्य ) गोडी लागणें ; लुब्ध होणें ; लालचावणें . भक्तीचिया सुखां गोडावली । ४ पाड लागणें ; पिकणें ( फळ ). म्ह० १ गोड करून खावें मऊ करून निजावें = अडचणींतहि सोय करून घ्यावी . २ गेले नाहीं तंववर जड , खाल्लें नाहीं तंववर गोड = माहीत नसलेलें सर्वच चांगलें असतें . सामाशब्द -
-
०उंडी स्त्री. एक झाड .
Site Search
Input language: