-
See : सात, सात
-
See : सात, सात
-
See : सात, सात
-
सप्तर्षि
(अ) प्रत्येक मन्वन्तरांतील सात ब्रह्मर्षि. चालू वैवस्वत मन्वन्तरांतील सप्तर्षिः १ कश्यप. २ अत्रि. ३ भरद्वाज, ४ विश्चामित्र, ५ गौतम, ६ जमदग्नि आणि ७ वसिष्ठ.
(आ) प्राचीन ऋषींपैकीं जे महर्षि विशेष प्रसिद्धीस आले त्यांचीं नांवें चिरस्मरणीय व्हावींत म्हणून उत्तरेकडील धरुवनक्षत्राभोंवतीं प्रदक्षिणा घालणार्या तारकासमूहांतील सात तेजस्वी तार्यांस दिलीं तीं अशीं - १ मरीचि, २ अत्रि, ३ अंगिरस, ४ पुलस्त्य, ५ पुलह, ६ क्रतु व ७ वसिष्ठ. यांत वसिष्ठांजवळच्या लहान तार्यास अरुंधती असें नांव दिलें आहे. हे चित्रशिखंडी नांवाचे सप्तर्षि होत. यांनी आपल्या सातमुखांनीं लोकधर्म सांगितला ([म. भा. शांति. अ. ३३५]). या तारका समूहासच वृहद्दक्ष किंवव खाटलें बाजलें म्हणताच. यांतच वसिष्ठाच्या तार्याजवळ एक लहान तेजस्वी दिसतो, तारा दिसतो, त्यास अरुंधती म्हणतात. वैदिक विवाहपद्धतींत अरुंधतीदर्शन म्हणून सप्तपदीनंतरचा एकविधि, यावेळी वधूला अरुंधती नक्षत्र दाखवून तूं अरुंधतीसारखी पतिनिष्ठ हो असें सांगावयाचें असतें.
कश्यपोऽत्रिर्मरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ॥ ([भाग - १३-८-५])
(इ) दोन डोळे, दोन कान, दोन नासिका - छिद्रें व एक मुख - वाणीचें इंद्रिय.
हे मस्तकावर असलेले सात ऋषि होत. ज्ञान घेणें व ज्ञान देणें हें कार्य अखंड चालू असतें. (वैदिक तत्त्वज्ञान)
(इ) (शरीरांतील) १ नाक, २ जिव्हा, ३ डोळे, ४ त्वचा, ५ कान, ६ वाणी आणि ७ मन.
(उ) १ आत्मा, २ बुद्धि, ३ अहंकार, ४ मन, ५ प्राण, ६ ज्ञानेद्रियें व ७ कर्मेंद्रियें. प्रत्येक शरीरांत हे सप्तऋषि आहेत आणि ते शरीररूपी घराचें रक्षण करितात.
"सप्तऋषः प्रतिहिताः शरीरे"(वा. यजु. ३४-५५)
Site Search
Input language: