Dictionaries | References

सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः

   
Script: Devanagari

सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः

   कोणतेंहि कार्य करावयाचें झाल्यास प्रथम पोटाची अथवा द्रव्याची व्यवस्था करावी लागते
   त्याशिवाय कांहीं चालत नाहीं. तु
   वीणावंशश्र्चंदनं चन्द्रभाराः शय्या यानं यौवनस्थास्तरुण्यःl नैतद्रम्यं क्षुप्तिपासाद्रितानां सर्वारभ्मास्तण्डुल
   प्रस्थमूलाःll
   सूर ६६.४०. शय्या वस्त्रं चन्दनं चारुहास्थं वीणा वाणी सुन्दरी यानारी ll न भ्राजन्ते क्षुत्चिपासातुराणां सर्वारम्मास्तण्डुंलाप्रस्थमूलाःll सूर ९६.२.
   पामो १६६. [ एकदा एक गुरु व त्याचें दोन शिष्य एका राजकेन्येच्या लग्नाला चालले होते. त्यांस वाटेंत एका चास पक्षाचें दर्शन झालें. तेव्हां दर्शन झालें असता धनलाभ होतो पण डावा गेल्यास अधिक फळ मिळतें, असें गुरुनें शिष्यांस सांगितलें. तेव्हा एक शिष्य आपणास चास डाव्या हातास जावा अशाकरितां वाट सोडून त्याच्या बाजूस गेला परंतु चास उडून दुसरीकडे गेला
   अशा रीतीनें पाठलाग करतां करतां चास डावा टाकण्यास त्यास सायंकाळ झाला. तेव्हां तो तसा टाकून मग तो राजधानीकडे गेला. इकडे गुरुएक शिष्य राजधानीस पोंचून राजकन्येच्या लग्नास उपस्थित झाले व त्यांस पुष्कळ द्रव्य मिळालें. इकडे हा शिष्य उशीर झाल्यामुळें गावाजवळ येतो तों वेशी बंद असल्यामुळें बाहेर मारुतीच्या देवळांत निजला. रात्रीं तेथें एक यक्ष व यक्षणी आली व त्यांस त्या शिष्याची हकीकत माहिती असल्यामुळें त्यांनीं एक गंमत करावयाचें ठरविलें. त्यांनीं त्या शिष्यास उचलून राजकन्येच्या महालांत ठेवलें व त्याठिकाणीं असलेल्या राजपुत्रास मारुतीच्या देवळांत ठेवलें व त्यांच्या कपडयांची अदलाबदल केली. रात्रीं राजकन्या येते तों हा पलंगावर गाढ निजलेला पाहून तिनें त्यांस उठवून पुढील श्र्लोकाचा प्रथम अर्ध म्हणून दाखविला
   तेव्हां त्या शिष्यानें उत्तरार्ध म्हटला. तेव्हां त्यास भूक लागली आहे असें समजून तिनें त्यास प्रथम यथेच्छ भोजन घातलें व नंतर ती तेथें निद्रिस्त झाली. पहांटेस यक्षयक्षिणींनी पुन्हां त्यांची अदलाबदल केली. दुसर्‍या दिवशीं राजकन्या म्हणूं लागली कीं, राजपुत्र हा माझा पति नव्हे तर दुसराच कोणी पुरुष रात्रीं येथें असून तो फार चतुर पंडित होता. तेव्हां दुसर्‍या दिवशीं तिनें पंक्तीमध्यें तूप वाढावयास घेऊन त्या श्र्लोकाचा प्रथमार्ध म्हटला. जेव्हां त्या शिष्याच्या पंक्तींत आली तेव्हां त्यानें उत्तरार्ध म्हटला
   मग तिनें त्यास ओळखून त्याच्याबरोबरंच विवाह केला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP