Dictionaries | References स सरता Script: Devanagari See also: सरत , सरतें , सरत् , सरोट Meaning Related Words सरता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . सरता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 p a Ending, the final one. सरता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ वंद्य ; श्रेष्ट ; मान्य ; कृतकृत्य . वाचां जना सुफळ करावें । तिहीं लोकीं सरतेआं होआवें । - दाव ४६ . रामानंद स्मरण करितां । केला सरता संतांत । - देव संतमालिका १० . २ ग्राह्य ; चालेलसें . जातींत सरता केला . - महि बखर ५८ . तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती । - तुगा . ३ पूर्ण ; योग्य ; पुरेसें . म्हणे माझे सेवेप्रती । लक्ष्मीहि नव्हे सरती । - रास १ . ८९२ . तेंवीं तुम्हीं आपले कृपादानें करून । सरतीं वचनें करावीं । - भवि १ . ७ . कैसा सरता होईन मी . । - रावि १ . ४ शेवटचा ; अखेरचा ; शेवटला . हे पहिली ना सरती . । - ज्ञा १८ . १११३ . ५ संपणारा ; खर्च होणारा ; आटोपणारा . जें सरतें जीवितवारी । तया औषधानें वैरी । काय जिव्हा न म्हणे । - ज्ञा ६ . ३६८ . प्राणी हे करितात आयु सरतें हें नेणवे अंतरीं । - नवनीत पृ १४१ . सरता पालव - पु . अंखेरीची स्थिति ; शेवटची पालवी ; शेवट ; अखेर ; शेवटचा भाग ; हंगामाचा अखेर ; र्हास काल . तुम्हीं लग्नाचे सरत्यापालवी आला . सरतापुरता - वि . पूर्ण ; पुरा झालेला ; संपलेला ; सगळा ; पुरा ; भरपूर ; पुरून उरण्याजोगा . तेचि भाग्यवंत । सरते पुरते धनवंत । सरतींपुरतीं , सरतेंपुरतें , सरतासरतीं - क्रिवि . १ पूर्णपणें ; भरपूर . २ अखेरीस ; सरतेशेवटीं . तरी आतां सरतेंपुरतें । आपुल्या समान करा मातें । - नव १७ . ८० . जे सावध होते परंतु सर्थ न केली सरतासरती । - ऐपो ३५८ . सरतेरात . सरतेरात्र , सरतीरात , सरतीरात्र - क्रिवि . रात्र संपेपर्यंत ; सारीरात्र ; रात्रभर . सरतेशेवट - क्रिवि . अखेरीस ; शेवटीं ; संपतांना ; अखेरच्या वेळीं , प्रसंगीं ; अंती . सरतेशेवटीं , सरत्याशेवटीं - क्रिवि . १ अखेरीस ; शेवटीं ; अंती . २ शेवटच्या जागीं ; अखेरीच्या भागास ; शेवटल्या भागीं , स्थळीं ; कडेला ; टोंकाला . न. ( व . ना . ) सरकी पेरण्याची बांबूची नळी ; मोघण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP