|
क्रिविशअ . १ पुढें ; पुढल्याबाजूस , जागीं ; अग्रभागीं . २ प्रत्यक्ष ; देखत ; समक्ष . ३ सरळ ; थेट ; नीट ; उजू ; ( रस्ता , नदी , झाडें , घरें यांची रांग - याचे संभवतात ते बोलणार्याच्या अंगविक्षेपावरून किंवा संदर्भावरून ओळखूं येतात ). ही समोर चालली ; हा मार्ग समोर आहे . ती वृक्षपंक्ति समोर लावली ; रेघ समोर आहे . ( कों . ) सरळ उंच , थेटवर ; सरळ उभा ( खांब , काठी , खिळा ). हा खिळा समोर मार . [ सं . संमुख ; गु . सामुं - मो . पं . मुहेरहे ] समोरचा , समोरला , समोरील - वि . पुढचा ; अग्रभागीं असलेला ; प्रत्यक्ष ; पुढील . समोरिलां घाईं । मजशीं जुंझतील काई । - शिशु ८९७ . समोरासमोर - क्रिवि . एकमेकांपुढें तोंडें करून असलेले ; परस्पर सन्मुख . समोरी - स्त्री . संमुखता ; विरुध्दता ; समोरील स्थिति ; प्रत्यक्षता ; समोरपणा . समोरून - क्रिवि . पुढून ; देखत ; समक्ष .
|