|
पु. सखाराम याचा संक्षेप . सखारामबापू बोकील . सखा देवा विठ्ठला - पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकीं तीन शहाणें ; सखारामबापू बोकील , देवाजीपंत चोरघोडे व विठ्ठसुंदर , अर्धे शहाणे नाना फडणवीस . पु. सोबती ; मित्र ; सहचर ; स्नेही . सख्याचें उध्दन । सखा साहे निवांत । - ज्ञा ११ . ५७४ . [ सं . ] सखा , सखासोयरा , विरूगा , सगा - सगासोयरा पहा . सखा , सख्खा - वि . प्रत्यक्ष , संबंधाचा , जवळच्या संबंधाचा ; चुलता , मामा , आत्या वगैरेच्या मार्फत संबंधाचा नव्हे . याचा वधी जो चुलता सखारे । - वामन नृसिंहावतार , ( नवनीत पृ . १२६ . मणिला कंठीं बांधुनि माझा सख्खा प्रसेन जो चुलता । - मोकृष्ण ८३ . १०४ . सखित्व - न . मैत्री ; स्नेह . सखी - स्त्री . १ मैत्रीण ; सोबतीण . २ शिमग्यांतील शृंगारिक लावणी . ३ लावणीच्या प्रारंभीं म्हणावयाचे श्लोक वगैरे गाणें .
|