Dictionaries | References

वाटणे

   
Script: Devanagari
See also:  वांटणे

वाटणे

वाटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  निरनिराळे भाग करून भागीदारास देणे   Ex. नवीन सत्राच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या
CAUSATIVE:
वाटून घेणे
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  पाणी घालून घासून किंवा रगडून बारीक करणे   Ex. तिने पाट्यावर मसाला वाटला
ENTAILMENT:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  वाटणीनुसार काही मिळणे किंवा दिले जाणे   Ex. आज शाळेत मिठाई वाटली जात आहे.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  विभागून तुकड्यात वेगळे-वेगळे होणे   Ex. स्वातंत्र्यानंतर भारत दोन भागात वाटला गेला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्याविषयी एखादी धारणा होणे   Ex. मला तो खूप चांगला वाटत होता.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
मानसिक अवस्थासूचक (Mental State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या गोष्ट इत्यादीचा फक्त जाणीव होणे   Ex. मला वाटते की आज काहीतरी होणार आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखादे कार्य करत आहे भासणे किंवा दिसणे   Ex. असे वाटले की ती काहीतरी बोलेल पण ती बोलली नाही.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  मनात एखाद्या प्रकारची धारणा किंवा विचार पक्का करणे किंवा मनाची समजूत करून घेणे   Ex. हा मुलगा मोठा होऊन शास्त्रज्ञ होईल असे आम्हां सर्वांना वाटते.
HYPERNYMY:
वाटणे
ONTOLOGY:
विचार करना^निर्णय लेना इत्यादि (VOA)">ज्ञानसूचक (Cognition)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : भासणे, इच्छा होणे

वाटणे

 अ.क्रि.  
 स.क्रि.  
 स.क्रि.  
   वरवंट्याने घासून बारीक करणे ; चूर्ण करणे ; चक्काचूर करणे ; पिष्ट करणे .
   निरनिराळे विभाग करुन भागीदारांस देणे . दक्षिणा वांटणे .
   भासणे ; भावना होणे ; समजणे . तुज वाटे हे जागृतिमज आली अनुभवा । - ज्ञा ७ . २०८ .
   पृथक काढून ठेवण . जे महर्षि वाटले । विरक्तां भागा फिटले । - ज्ञा ५ . १४७ . [ सं . वट = विभागणे ] वांटप - न . विभागणी ; वांटणी ; मालमत्तेची हिस्सेरशी . वांटा - पु . हिस्सा ; भाग ; अंश . ( गो . ) वांटो ; वांटे . वांटा उचलणे - मध्ये सहभागी होणे ; अंशभाक असणे ; हात असणे ; भागीदार होणे ( पापाचा , यशाचा , पुण्याचा ).
   ( ल . ) घासाघीस , चर्चा , खल , छाननी करणे ; खोदखोदून चौकशी करणे . वाटूनघाटून - क्रिवि .
   मनांत येणे ; इच्छा होणे ; सुचणे . संसार सोडावासा वाटतो .
   चिरडून भरडून ; बारीक चूर्ण करुन .
   ( ल . ) अत्यंत त्रास देऊन ; छळ करुन ; गांजून गांजून . ( क्रि० खाणे ; पिणे ; गिळणे ). हा वाटूनघाटून माझा प्राण खातो , मला प्यायला पाहतो . वाटप - न . ( कु . ) वांटून तयार केलेला पदार्थ , मसाला . - क्रि . ( गो . ) वाटणे ; चूर्ण करणे . वाटपण - न . ( गो . ) घासाघीस . वाटपिठाचा - वि . वाटून केलेल्या पिठाचा ( उंडा , वडा इ० ). वाटली डाळ - स्त्री . चण्यांची डाळ भिजवून वाटून केलेला खाद्यपदार्थ . वाटली डाळ करणे - ( वाप्र . )
   संपुष्टात आणणे .
   नामशेष करणे , जवळजवळ नाहीसे करणे .
   उगाच चवीपुरते खाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP