|
उ.क्रि. कांही धार्मिक व्रत आचरणे ( विशेषतः बायकांनी ). मंगळागौरी पांच वर्षे वसावी लागते . [ सं . उप + आस - उपासना ; वसा ] अ.क्रि. राहणे ; मुक्काम , वस्ती करणे . स्थळी , जागी असणे ; स्थित , स्थानापन्न असणे ( गांव इ० ). कवण खंडी कवण देशी वसत असतो . वस्तीने युक्त होणे ( गांव , देश इ० ). प्लेगनंतर आतां कोठे गांव वसला . [ सं . वस - वसन ] म्ह० मनी वसे ते स्वप्नी दिसे . सोने पाहावे कसून माणूस पाहावे वसून . वसतकरु - पुस्त्री . उतारु ; प्रवासी ; वाटसरु . [ वसणे + करु प्रत्यय ] वसता - वि . वस्तीचा ; लोक असलेला . - एभा ३ . ६७९ . वाटती दशदिशा उदासा । वसते गोकुळ वाटे ओसा । - ह २१ . १३ . राहणारा . स्वानंद वैकुंठी सदा वसता । तुझे ऐश्वर्य स्वभावता । - एभा २१ . १ . वसति , ती - स्त्री . रहिवास ; मुक्काम . राहण्याची जागा , ठिकाण , निवास . वसतिगृह - न . निवासस्थान ; घर . ( विद्यार्थी , पांथस्थ इ० करितां ) राहण्याजेवण्याची जागा ; भोजननिवासगृह ; खाणावळ . ( इं . ) होस्टेल . वसविणे - उक्रि . स्थापन करणे ; रचणे . वस्ती करविणे . नेऊन ठेवणे . वसिष्ठपुत्र एकशत गुणी । जेणे वसविले कृतांतभुवनी । - मुआदि १५ . १२२ . ठेवणे ; देणे . त्याचि चारी भुजा शोभती । आयुधे वसविली हाती । - एरुस्व १ . ४६ . वसति करणे , राहणे , प्रत जाणे . तेणे वसविले स्वर्गालय । आतां कवणा पुसावे । - जै १२ . १०६ . वसिन्नणे - वसणे पहा . - मुआदि ५ . १११ . - ह २६ . १७७ .
|