Dictionaries | References

रेंदगड

   
Script: Devanagari
See also:  रेंद , रेंदगूड , रेंदडा , रेंदा , रेंदाड

रेंदगड     

 स्त्री. नपु . स्त्री . पु . न .
घर , गुरांचा गोठा इ० तील केरकचरा किंवा गदळ .
चिखल ; घाण .
तेल , तूप इ० च्या बारदानांतील गाळ ; पाण्यांत जमलेला मातीचा अंश ; मातीमुळे गढूळ झालेले पाणी .
ब्रण , गळूं इ० तील दाट पू ; रक्त .
शेणाची रास .
पाघळलेला गूळ .
राड ; खातेरे . रेंदा - रेंदाड - रेंदगड - रेंदगूड काढणे - झोडपून काढणे ; रक्त निघेपर्यंत मारणे . रेंद - वि . आळशी ; मंद ; सुस्त ; जड . रेंदवणी - न . गढूळ पाणी ; गदळ पाणी . [ रेंदा + पाणी ] रेंदसरा - पु . पाणी पाझरुन येण्यासाठी किंवा पडण्यासाठी ठेविलेले भांडे . [ रेंदा + सरणे ] रेंदाड , रेंदगड , रेंदगूड - वि . चिखलाने भरलेले ; घाण किंवा धूळमिश्रित ( पाणी , तेल , तूप , रक्त इ० ). रेंदावणे - अक्रि .
( पाणी इ० ) गढूळ होणे ; घाण होणे .
( गळूं इ० मध्ये ) पू सांचणे ; पुवाने डबडबणे ; पू गळण्यासारखे बरबरीत होणे . रेंदाविणे - सक्रि . ( पाणी इ० ) गढूळ करणे ; घाण करणे . रेंद्या - वि . रबरबीत . रेंद्या चिखुल ते वाळलेसे वाटे । - दावि ७६१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP