न. रुधिर ; जिवंत प्राण्याच्या शरीरांत सतत वाहणारा तांबडा रस ; शरीरांतील एक द्रवरुप धातु . - वि .
तांबडा ; तांबूस रंगाचा ; रक्तासारखा ( तांबडा ) लाल ; लालभडक .
रंगविलेलें . रंगीत .
आषक ; अनुरक्त ; संवय , शोक , लळा , ओढा असलेला ; [ सं . रंज - रत - रक्त ; फ्रेंजि . रत , पोर्तु . जि . अरत ] ( वाप्र . )
०आटविणें रक्ताचें पाणी करणें - उरस्फोड करणें ; फार मेहनत करणें .
०पडणें शौच्याच्यावाटे रक्त जाणें . रक्ताचें पाणी करणें , आणि हाडाचे मणी करणें अतिशय इमानानें आणि मेहनतीनें कामगिरी करणें .
०पाडणें ( मंत्र , जादूटोणा इ० नीं ) बाहेर रक्त पडेल असें करणें . रक्तावणें , रक्ताळणें क्रि .
रक्त वाहूं लागणें ; रक्तस्त्राव होणें ( जखमेंतून ).
रक्तबंबाळ होणें ( शरीर , वस्त्र , वस्तु ). सामाशब्द -
०ओढ स्त्री. रक्त पडतें अशी हगवण ; रक्त जाणें .
०कांचन पु. एक डोंगरी झाड ; तेंटू , तेंतू .
०गुल्म न. मुलाच्या डोक्याचीं हाडें व त्वचा यांमध्यें कधीं कधीं रक्त सांचून गुल्म होतें तें . - बालरोगचिकित्सा ५० .
०गोलक पु. ( शाप . ) रक्ताचा थेंब , बिंदु इ० ( इं . ) ब्लड ग्लोब्यूल . - सेंपू २ .
०चंदन पु. एक वृक्ष ; तांबडा चंदन ; याच्या बाहुल्या , खेळणीं इ० करतात . [ सं . ]
०चंदनी वि. रक्तचंदनाच्या संबंधीं .
०तालू वि. घोड्याचा एक प्रकार . ताळूचे ठिकाणीं तांबडा , दारुप्रमाणें नेत्र ; मानेवरील केस आरक्तवर्ण आणि बाकी सर्व अंग तांबडें अशा घोड्यास रक्ततालू म्हणतात . - अश्वप १ . २३ .
०धातु पु. तांबडा खडू ; तांबडा ( हर ) ताल . [ सं . ]
०नेत्र वि. तांबडे , लाल डोळे असलेला ( घोडा ); अशुभ चिन्ह होय . [ सं . ]
०प
राक्षस .
ढेंकूण . [ सं . रक्त + पा = पिणें ]
०परमा में - पुन . जननेंद्रियाचा रोग ; कांहीं व्याधीच्या योगानें शिश्नद्वारां जो रक्तप्रवाह तिडीक लागून होतो तो ; रक्तप्रमेह . मूत्रकोड आणि परमें । रक्तपिती रक्तपरमें । - दा ३ . ६ . २९ . [ सं . रक्तप्रमेह ]
०पात पु. खून ; कापाकापी ; मारामारी ; कत्तल ; रक्त सांडणें . त्याच्या दाराशीं रक्तपात केल्यावांचून तो पैसा देणार नाहीं . [ सं . ]
०पिती स्त्री. महारोग ; महाव्याधि ; गलतकुष्ट रोग . [ सं . रक्त + पित्त ]
०पित्या वि. रक्तपिती भरलेला ; महारोगी .
०पित्त पुन . नाक , तोंड इ० पासून रक्तस्त्राव होणें . आम्लपित्त रक्तपित्त । - गीता १३ . २४९७ .
०प्रदर पु. एक प्रकारचा प्रदररोग .
०प्रमेह पुन . रक्तपरमा - में पहा . जननेंद्रियाच्या द्वारें रक्तस्त्राव होणारा प्रमेह ; लघवींतून रक्त जाणें .
०बंवाळ बोंबाळ - वि .
रक्तानें भरलेला , माखलेला ; अंगांतून अतिशय रक्त वाहत असलेला .
शरीर अवयव इ० ची अशी स्थिति . हाताचा रक्तबंबाळ झाला .
०बाऊ बाहु - पु . एक सन्निपात ज्वर ; अंगावर तापाचे तांबडे चकंदळे उठणें .
०बीज वि.
ज्याच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होई असा ( एक असुर ).
ढेंकूण
( ल . ) डाळिंब , तांबडे दाणे असलेलें . [ सं . ]
०बुंद पु. राक्षस . [ सं . रक्तबिंदु ]
०बोळ पु. एका झाडाचा औषधी तांबडा डिंक , गोंद .
०भरित ( गो . ) रक्तानें भरलेला .
०मॉंडळी स्त्री. ( गो . ) सापाची एक जात . ही चावली असतां तोंडांतून रक्त वाहतें .
०मास मांस - न . रक्त व मांस ; शरीरांतील महत्त्वाचा अंश . रक्तमांस आटलें - शोषलें - सुकलें इ० .
०मांस - एका रक्ताची ; कुळांतील ; सगोत्र .
एक - एका रक्ताची ; कुळांतील ; सगोत्र .
०मांस - नात्याचा कांहीं संबंध नसणें ; नातें नसणें ; असगोत्र .
निराळें - नात्याचा कांहीं संबंध नसणें ; नातें नसणें ; असगोत्र .
०मान्य वि. लढाईमध्यें केलेल्या कार्याबद्दल , झालेल्या जखमांबद्दल बक्षीस दिलेल्या , सारा माफ जमिनी .
०मुखराग पु. ( नृत्य ) वीर , रौद्ररस , किंवा मद्याची धुंदी दाखविण्याची तोंडावरील लाली , तेज .
०मेह पु. रक्तप्रमेह पहा . [ सं . ]
०मोक्षण न. शरीरांतील रोगांश बाहेर पडावा म्हणून जळवा लावून , कापून , फांसण्या टाकून किंवा शिरा तोडून जें रक्ताचें निष्कासन करितात तें .
०रंजन न. तांबडें करणें .
०रुधिरपेशी स्त्रीअव . रक्ताच्या तांबड्या पेशी . ( इं ) रेड कॉर्प्युस्कल्स .
०रोडा रोहिडा रोहडा - पु . एक प्रकारचें झाढ , औषधी वनस्पति ; रगतरोडा . पानें भोकरीच्या पानासारखीं , मिर्याहून मोठीं गोल व तांबड्या रंगाची फळें येतात . [ सं . रक्तरोहितक ]
०वर्ण वर्णी - वि . लाल ; तांबड्या रंगाचें . [ सं . ]
०वाहिनी स्त्री. जीमधून रक्त वाहत असतें अशी शरीरांतील नाडी . [ सं . ]
०विकार पु. रक्तदोष ; रक्तांतील बिघाड [ सं . ]
०विपाक पु. रक्तदोषानें होणारा रोग . विपाक पहा . [ सं . ] वृद्धि स्त्री . ( आजारानंतर ) शरीरांत रक्त वाढणें याच्या उलट रक्तक्षय . [ सं . ]
०शोषण न.
( आजारामुळें ) रक्त कमी होणें ; अंगांतील रक्त कमी करुन कृश करणें .
( ल . ) लोकांकडून त्यांच्या शक्तीबाहेर पैसे उकळणें ; जळवा लावणें . [ सं . ]
०सांड स्त्री. ( कों . ) रक्तमोक्षण पहा . फासण्या टाकून रक्त काढणें .
०स्त्राव पु रक्त जाणें , वाहणें ; रक्ताचा पाट . [ सं . ] रक्ताचीआण स्त्री . एखाद्याच्या रक्ताची शपथ घेणें ; निकराची शपथ . बंदाखालीं बसणें पहा . रक्तांजनी वि . एकरंगी पांढरा असून डाव्या कुशीवर फक्त तांबडी टिकली असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ९७ . [ रक्त + अंजन ] रक्तातिसार पु . रक्ताची हगवण . - बालरोगचिकित्सा १०७ . [ रक्त + अतिसार ] रक्तांबर पु . भगवें , तांबडें वस्त्र . - वि .
तांबडें वस्त्र परिधान केलेला .
रक्तानें न्हालेला ; जखमी झालेला . [ सं . रक्त + अंबर ] रक्तांबील , ळ , रक्ताभोंबळा - वि . ( काव्य ) रक्तानें माखलेला ; अंगांतून रक्तस्त्राव होत असलेला . [ सं . रक्ताविल ] रक्ताभिमान - पु समान रक्ताविषयीं अभिमान , जागृति ; जातीचा जागतेपणा . आम्हालासुद्धां रक्ताभिमान हा आहेच . - टिले २ . ४५० . रक्ताम्र - पु . एक प्रकारचें झाड व त्याचें फळ . रातंबी पहा . [ सं . रक्त + आम्र ] रक्तार्श - पु . मूळव्याध ; रक्ती मूळव्याध ; शौचाच्या वाटेनें रक्त पडणें . [ सं . ] रक्तावरोध - पु . रक्त न वाहणें ; रक्ताचें अभिसरण होण्याचें थांबणें ; रक्ताचा विशिष्ट जागीं संचय होणें . [ रक्त + अवरोध ] रक्ताशय - पु . शरीरांतील रक्त संचयाची जागा ; ह्रदय . [ रक्त + आशय ] रक्तासन - न . तांबड्या दुपारीचें झाड . रक्ताक्ष - वि .
तांबड्या लाल डोळ्याचा ( घोडा ).
तांबडा ; लाल ( मोतीं , रुद्राक्ष ) [ सं . रक्त + अक्ष ] रक्ताक्षी - पु साठ संवत्सरांतील अठावन्नावा संवत्सर . रक्ता - वि . पंधराव्या श्रुतीचें नांव . [ सं . ] रक्ति - स्त्री . अनुराग ; रंग . [ सं . ] रक्तिका - वि . सातव्या श्रुतीचें नांव . [ सं . ] रक्तिमा - पु . तांबडेपणा ; लालपणा ; लाली . [ सं . ] रक्तिया - वि . लाल रंगाची छटा असलेला ( हिरा ). हा दोष अशुभ मानतात . रक्ती , रक्त्या मूळव्याध - स्त्री . जींत रक्त पडतें अशी मूळव्याध . रक्त्या बोळ - रक्तबोळ पहा . रक्तोत्पल - न . तांबडें कमळ . [ रक्त + उत्पल ]