Dictionaries | References

भाकरीचा खेळ खेळणें

   
Script: Devanagari

भाकरीचा खेळ खेळणें     

भाकरीचा खेळ या नांवाचा मुलें खेळ खेळतात. या खेळामध्यें चपटा दगड घेऊन तो तळयाच्या अगर नदीच्या कांठावर उभें राहून त्यांत सरपटता फेंकून, पाण्यामध्यें तो टेंकेल त्या ठिकाणीं वर्तुळकावर आकृति होतात त्यांस भाकर्‍या म्हणतात व त्या प्रत्येकाच्या किती होतात त्या मोजून त्याप्रमाणें डाव खेळतात. अशा खेळांत दगडाऐवजीं नाणें वापरुन खेळ खेळणें म्हणजे पैशांनीं भाकरीचा खेळ खेळणें
म्हणजे पैशाची उधळपट्टी करणें होय. पर्याय - अत्तराचे दिवें लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP