Dictionaries | References

भराका

   
Script: Devanagari

भराका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 6 Whisk, whirl, stoop, swoop, spring, dash, any movement of suddenness and impetus. Ex. पिशाच संसरतांच ह्या भराक्या- सरसेंच विहिरींत उडी टाकली; घारीच्या भराक्यानें पोराची भाकर गेली; हाताचा-पदराचा-अंगाचा भ0. 7 Ventris crepitus cum strepitû. v सोड, सार. 8 भराका, although having other senses, well agrees with the common word झपाटा, where see further illustration. भराक्यासरसा उठणें To start up, spring up, jump up, bounce up. भराक्यासरसा येणें-जाणें-पडणें To come, go, fall with a whirr, whiz, or similar sound, or with a rush or other form of suddenness and impetus.

भराका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The whirr, flurr or sudden and noisy vibration of wings. A run or rush; A blast or overpowering afflatus of a gas or devil; a paroxysm of rage.

भराका     

 पु. भरती ; भरभराट ; चालता काल . ( भरणें )
 पु. 
पंखांची भरारी , झपाटा ( उडणार्‍या पक्ष्यांचा ). ( क्रि० मारणें ; उडणें ; चालणें ).
सणाणणारी गिरकी ( गोफणीची , हाताची ). ( क्रि० मारणें ).
धांव ; जोरानें घुसणें ( शब्दशः व ल . ); जलद आणि जोराचा यत्न , व्यापार . घोड्यावर बसलों आणि भराक्यासरसाच पुण्यास दाखल झालों .
देवाचा , पिशाचाचा झटका , झपाटा ; रागाचा , वार्‍याचा , झटकारा , सनाटा ; कामाचा , मारण्याचा , गाण्याचा धडाका इ० .
घन , दाट वृष्टि ( दगड , बाण , भाले यांची ).
झपाटा ; गिरकांडा ; झेंप ; धडका ; कोणतीहि आकस्मिक आणि वेगाची हालचाल . पिशाच संचरताच ह्या भराक्यासरसेंच विहिरींत उडी टाकली .
अपानवायु सरणें ; पादणें . ( क्रि० सोडणें ; सारणें ).
( सामा . ) झपाटा . झपाटा पहा . [ ध्व . ] भराक्यासरसा उठणें - अक्रि . झपाट्याबरोबर उठणें . भराक्यासरसा येणें , जाणें , पडणें - अक्रि . भिरिरी , सणाण इ० आवाज करुन , सपाट्यानें किंवा वेगानें येणें , जाणें , पडणें . भराटणें - सक्रि . त्वरेनें करणें , भरकटणें ; झपाटणें ( एखादें काम ); खाऊन चट करणें ; झटकर फडशा पाडणें ( अन्नाचा ); घाईघाईनें कसेंबसें उरकणें , करणें . भराटा - पु . भर्र आवाज होईल असें उडणें ( पक्ष्यांचें ); इकडेतिकडे झटकणें ( हलका कचरा , जिन्नस ); गोंगाटाने वाहणें , चालणें ( वार्‍याचें ) आदळणें ( पावसाच्या सरीचें ); जलदीची , झपाट्याची , दणक्याची क्रिया . ( धांवणें , जाणें , बोलणें , खाणें इ० ) तांतड ; निकड ; झपाटा ( काम करावयाचा ); फडशा ( लिहिण्याचा , कामाचा ); गोंगाटाची , धडाक्याची हालचाल , क्रिया . ( क्रि० होणें ; चालणें ; लागणें उडणें ; करणें ; मांडणें ; चालविणें ; लाविणें ; उडविणें ).
अत्यंत वैपुल्य ; समृद्धि . ( सुगीची , पिकाची ); पिकाचा , धान्याचा , आंब्याचा , अमदानीचा भराटा . - वि . प्रचुर ; विपुल ; जोराचा ; भक्कम . भराटा - पीक -- पाऊस - वारा .
जलद केलेला व संपूर्ण फन्ना , फडशा ( अन्नाचा , आडकामांचा ). ( क्रि० उडणें ; होणें ; करुन टाकणें ; करणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP