|
टांच मारणें ; पळावयास लावणें ; भरधांव सोडणें . चौखुर सोडणें ; पिटाळणें . ' तो एक स्वार केवळ पट्टी भरीत मागून आला व त्यानें जोरानें त्याच्या पाठींत आपला भाला मारला .' - दुरं २२५ . ' जगलों तर पायाशीं पुन्हां येईन असें म्हनुन नारायणरावानें आपल्या घोड्यास पट्ती दिली .' दुरं २२७ . स.क्रि. ओवरजत्रा , ओवरयात्रा , भरणी पहा . पूर्ण करणें . बुझविणें ; भरुन काढणें ( खळगा , रिकामी जागा , व्यंग ). आंत , वर , घालणें , ठेवणें ( भरीत , भरताड , पूरणद्रव्य ); ठांसणें ( बार ). आंत ओतणें ( रस , भुकटी , धान्य , वाळू इ० ). सिंधू कवण भरी । - ज्ञा १३ . ५६ . सर्वत्र माखणें , लिप्त करणें ( तेल तूप , चिखल , धूळ , काजळ इ० - सामान्यतः अपवित्र घाणेरड्या वस्तूनीं ). पूर्ण करणें ( कच्चे आकार , आराखडे , रकाने , घरें , तक्ते , कोष्टकें इ० ). भरणा करणें ( देणें असलेले पैसे इ० चा ). खूट , तोटा पूर्ण करणें ; हानिनिष्कृति करणें . घालणें , लेणें ( मुख्यत्वें दागिना ). बांगड्या भरल्या , गोट भरले . पुरा करणें ( नियतकाल , वायदा ). चार दिवस कमी आहेत ते भर मग चाकरी सोड . ( सुतारी ) ( खा . ) तयार करणें ( बाज , खुर्ची इ० ). रामभाऊ माझी बाज भरुन द्या . मारणें ; भोसकणें . पळतां तदुरीं शर शीघ्र भरी । - मोरा हररमणीय रामायण २० . [ सं . भृ ] भरणें - अक्रि . अंगानें जाड , भरदार , दळदार होणें ( शरीर , फळें , दाणे ); भरुन जाणें ( कणीस ). बरोबर असणें ; तंतोतंत होणें ( ठराविक संख्या , परिमाण यांच्या इतकें ). तांदूळ चार पायली भरले . पूर्ण , पुरा होणें ( मुदत , काल ). वर्ष , आयुष्य भरलें . जड आणि बधिर होणें ( श्रमानें , बसण्यानें - गुडघे , पाय इ० ) भरुन निघणें ( विहीर , खांच ); भरुन येणें ; मठारणें व भरुन जाणें ( बरी होत जाणारी जखम , क्षत ). रुपून बसणें ; शिरणें ; घुसणें ( कांटा , बाण इ० ). गुरुसि त्यजुनि , व्यूहीं भीम , त्रिपुरीं जसा हरशर भरे । - मोभीष्म ७ . ७ . संचरणें . दोघे पत्री पाशीं गुंतुनि भरले उडोनि गगनींच । - मोउद्योग ५ . ५५ . भरती येणें . कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती । - ज्ञा १३ . १३८ . जमणें ; एकत्र होणें , मिळणें , केला जाणें ( बाजार ). बाजार चांगला भरला . तो मोठा गांव आहे तेथें बाजार भरतो . [ सं . भृ , भरण ] भरुन येणें - अक्रि . वर येणें ( उकळणारें द्रव द्रव्य ). भरणें - उक्रि . पात्रांत समाविष्ट करणें . गच्च करणें . रंग देणें ( चित्र , कोष्टक इ० कांस ). भरणें . भरत - न . भरीत पहिल्या तीन अर्थी पहा . भरताचें भांडें - न . विशिष्ट मापाचें , परिमाणाचें भांडें . [ भरीत + भांडें ] भरतक - न . पूरण ; पुरें करणें ( संख्या , परिमाण ). भरगत ; बारदान ; भरताड . सामान लादणें ; भरणें ( गलबत , गाडी इ० कांत ) भरताड - स्त्री . सामानानें लादलेला तांडा ( गलबतें , गाड्या , पशू इ० कांचा ). वरीलप्रमाणें लादलेली , भरलेली स्थिति ( कों . ) पाणरहाटाचे भरुन वर येणारे लोटे . याच्या उलट रिताड . भरती - स्त्री . समुद्राच्या पाण्याचा चढ . हा विशेषतः चंद्राच्या आकर्षणानें प्रत्यहीं दोनदां ( सुमारें १२ तास १५ मिनिटें इतक्या अवकाशानें ) होतो . ओहटी , सुकती यांच्या उलट . चढाई . गिलचांची झाली भरती । - संग्रामगीतें ६९ . पूरण ; भरण ; लादणी . पूर्ण झाल्याची , लादल्याची स्थिति . ( गलबत , गाडी ). नोंदणी . ( सैन्य , मजूर इ० ) ( ल . ) भरभराट ; वृद्धि . भरती सुकती - स्त्री . ( कों . ) भरती व ओहोटी ; चढउतार . भरतीचा - वि . पूर्ण करण्यास , भरण्यास लावलेला , पाहिजे असलेला . फक्त परिमाण , संख्या पूर्ण करण्याच्या , खळगा , जागा भरुन काढण्याच्या लायक ( वस्तु ). भरतुक - न . भरीत ; बारदान ; भरताड . ओझें वाहून नेण्याबद्दलचें भाडें . भरतें , भरितें - न . पुरतेपणा ; पूर्णता ; पुर्ति ( गुन्हा , पाप , अन्याय यांची ); पराकाष्ठा ( ताप , अव्यवस्था , इ० कांची ); सीमा ( शीण , आजार , दुःख इ० कांची ); सहनशक्तीपर्यंतची मर्यादा ; दाहाची पूर्ण संवेदना ( शैत्याची - मुख्यत्वें ज्वरापूर्वी होणारी ); उमाळा ; भरती ( शोक , दुःख , आनंद इ० ची ). ( क्रि० येणें ). भर अर्थ १ पहा . आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती । - ज्ञा १८ . २८९ . समुद्राच्या पाण्याचा चढ . वृद्धि . इतरांच्या जाळाया भरतें सुकृताधनातमा येतें । - मोमंभा ३ . १४ . ०येणें जोर येणें ; समृद्धि प्राप्त होणें . भरला भरला वि . चांगला भरलेला ; समृद्ध ; भरभरणारा ( संपत्ति , संतति , मित्र , कीर्ति इ० कानीं ); परिपूर्ण ( प्रजेनें राज्य , उत्पन्नानें शेत , देश व सामान , भांडीं यानीं घर ). भरला भारला - वि . पतदार ; अब्रूदार ; लायकीचा ; वजनदार ( व्यापारी , मनुष्य ); भरभरीचा ( व्यापार , काम ). [ भरणें + भार ] म्ह० भरल्या गाड्यास सूप जड नाहीं ! भरलीसरली , सवरलेली - वि . ( बायकी ) बाळंतपणाचे दिवस नजीक आलेली ; गर्भवती . भरलें कुंकूं - न . ( बायकी ) पुर्ण सौभाग्य . माझें काय वाईट होत आहे ? भरल्या कुंकवानें मी देवाघरीं जात आहें . भरलें घर - न . पुष्कळ माणसें असून भरभराटींत असलेलें इष्टमित्रांनीं व्यापलेलें असें कुटुंब . माग म्हणतांचि म्हणे भरलें घर । - राक २ . ३८ . भरलें धरणे - क्रि . गडप करणें ; देवाला कौल लाविला असतां त्यानें उजवी , डावी न देणें . देवानें भरलें धरलें . भरलें शेत - न . भरपूर पिकलेलें शेत . भरल्या ओटीनें - क्रिवि . ( बायकी ) मुलांबाळांसह सुखरुप . भरल्या ओटीनें बाळंतीण सासरीं जाऊं दे . भरल्या घोसानें , बंदांत , मरणें - तरणाताठा मरणें . भरल्या पायांचा - वि . चिखलानें इ० मळलेले पाय असलेला ; बाहेरुन आल्यावर पाय न धुतलेला . भरल्या पायीं - क्रिवि . बाहेरुन चालून आल्यावर पाय न धुतां . भरल्या पोटी - क्रिवि . पोट भरलेलें असतां . भरलेल्या आंगाची - वि . ( कों . ) गरोदर . भरान येणें - अक्रि . ( कु . ) दुःखाचे अश्रु येणें ; ह्रदय भरुन येणें . कफानें छाती भरणें . त्यंकां खूप भरान इलां . भरवड - स्त्री . ( कु . ) ओसाड जमिनींत भर घालून तयार केलेली जमीन . खारवट जमिनीपैकीं टणक जमिनींत रोहपेरा करतेवेळीं ती जमीन पावसाच्या पाण्यानें तुडुंब भरुन काढणें . भरवण - न . एके वेळीं दिव्याच्या टवळ्यात , तळणाच्या कढईंत घातलेलें तेलाचें परिमाण ; एके वेळीं जमलेल्या काजळाचें परिमाण इ० . भूत काढण्याकरितां भुतानें झपाटलेल्या माणसावरुन ओवाळलेलें द्रव्य ( कोंबडें , नारळ इ० ). भराई - स्त्री . भरण्याची किंमत . भरणें . भराभर - स्त्री . घाईचें भरणें . भराव - पु . भरण ; पूरण ( खांच बुजविण्याची ). भरल्याची स्थिति भरावण , वळ - स्त्री . ( कों . ) जमीन भाजण्याकरितां तिजवर गवत , काट्या , छाट आणि शेण इ० पसरणें . भराविणें - सक्रि . शेणानें , घाणीनें चोपडणें , माखणें ( हात , पाय , वस्त्र ). भरविणें पहा . भरीचा - वि . विवक्षित माप पूर्ण भरेल इतका . निम्मेंशिम्में पात्र भरले असतां तें पूर्ण भरेल इतका नवीन घालावयाचा ( पदार्थ ). भरीत , भरित , भर्त - न . लादल्याची , भरल्याची स्थिति . भरलेला , भरावयाचा माल ( पोतें इ० त ); ओझें ; बोजा . हें सामान दोहों बैलांचें भरीत आहे . लादणी ; ओझें ; भरताड . चिघळणार्या जखमा , गांठी यांची पूयमय व नासलेली स्थिति . वांगें वगैरे भाजून दहीं घालून केलेली कोशिबीर . ( वांगीं इ० ची ). ०पत्र न. गलबतावरील भरताची ( बारदानाची ) यादी . भरुन देणें सक्रि . खुटीची , तोट्याची निष्कृति करणें . भरुन पावणें सक्रि . पूर्णत्वानें पावणें ; पुरी करुन मिळणें ( मागणी इ० ).
|