|
न. अन्न ; भोज्य ; खाद्य . आहार ; जीवन ; खाद . [ सं . भक्ष = खाणें ; भक्ष्य ] भक्षक - वि . खाणारा ; भक्षी पहा . [ सं . ] भक्षण - न . खाणें . भक्ष पहा . म्ह० भात भक्षणा पोळी दक्षिणा . भक्षणीय - वि खाण्यास योग्य ; खाण्याजोगा . [ सं . ] भक्षणें - सक्रि . खाणें . [ भक्षण ] ०स्थानीं क्रिवि . भक्षाच्या जागीं ; अन्नाऐवजीं . ( वाप्र . ) ०स्थानीं , सोडणें , उतरणें - टाकणें , सोडणें , उतरणें - भक्षाच्या स्थानीं टाकणें ; सोडणें ; घशांत उतरविणें ; गट्ट करणें ; गडप करणें . ( विश्वासानें ठेवलेला पैसा , माल ) ०स्थानीं , उतरणें - क्रि . पडणें , उतरणें - क्रि . भक्षाच्या स्थानीं पडणें ; घशांत उतरलें जाणें ; गट्ट केलें जाणें . ( सलगीनें ) खाऊन टाकणें ; खाणें ; खाऊन टाकलें जाणें ; खाल्लें जाणें . भक्षित - वि . खाल्लेला . [ सं . ] भक्षी - वि . खाणारा ; ( समासांत ) अन्न - तृण - फल - मांस - अल्प - बहु - मित - अमित - पथ्य - अपथ्य - कदन्न - परान्न - भक्षी . [ सं . ] भक्ष्य - न . खाद्य ; अन्न . - वि . खाण्यास शक्य . उद्दिष्ट , जरुर , योग्य ; भक्षणीय . [ सं . ] भक्ष्यभोज्य - न . ( व्यापक ) भक्ष्य पदार्थ . भक्ष्येंभोज्यें - नअव . खाद्यें . [ सं . ] भक्ष्यभाक्ष्य - वि . भक्षावयास व भोजनास योग्य ( पदार्थ ). [ सं . ]
|