Dictionaries | References

बोका

   
Script: Devanagari

बोका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A kidney. 4 P The chest or breast.

बोका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A he-cat. fig. A huge loutish person.

बोका

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मांजरातील नर   Ex. बोक्याने फडताळावर ठेवलेले दूध फस्त केले
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

बोका

  पु. मूत्रपिंड . [ सं . वृक्क ]
  पु. 
  पु. छाती ; ऊर . बोकेफोड , बोकाफोड - स्त्री .
   मांजरांतील नर .
   कांहींहि फायदा नसतां जोरानें ओरडणें ; रिकामी उरस्फोड करणें .
   ( ल . ) गल्लेलठ्ठ , खाऊन खाऊन माजेलेला , धिप्पाड मनुष्य किंवा पशु : ( कोणताहि ) राक्षसी पदार्थ . म्ह० शिंक्याचें तुटलें , बोक्याचें पटलें किंवा शिंकें तुटलें आणि बोक्याचें फावलें = शिकें तुटलें असतां दूधदूभतें बोक्याला ज्याप्रमाणें आयतें खाण्यास मिळतें त्याप्रमाणें एखाद्याचा अकल्पित रीतीनें आयता फायदा होणें . बोकेजुंज , झुंज - स्त्रीन . मांजरांचें भांडण , झुंज , झोंबी . बोकेसंन्यास - पु . संन्यासाचें ढोंग ; खोटा संन्यास ; लोकांना फसविण्याकरतां घेतलेला खोटा संन्यास . बोकेसंन्यासी - पु . दांभिक संन्यासी ; ढोंगी साधु ; बोका ज्याप्रमाणें मोठा साधुत्वाचा डौल घालून मुकाट्यानें वसतो पण उंदीर नजरेस पडतांच त्याचें साधुत्व लटपटून तो त्याच्यावर झडप घालतो त्याप्रमाणें लाभाची संधि येतांच आपलें खरें स्वरुप प्रगट करणारा ; संभावितपणानें आपले कपटविचार झाकणारा .
   ( ल . ) निष्फळ शिकविणें ; निष्फळ प्रयत्न . [ बोका + फोडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP