|
न. न. आच्छादन ; आवरण ; गाठोडें किंवा पोथी बांधण्याचा रुमाल . ( गो . ) बासाण . नाना गोफ नाना बासनें । - दा १९ . १ . २० . भांडें ; मोठें भांडें ( धातूचें , मातीचें ). किस्मतगार हांडाबासन संभाळावयास गुंतले . - भाब ९७ . ( व . ल . ) वाद्य . गाठोडें ; कपडे बांधून ठेवलेलें बोचकें . ( ल . ) प्रचंड , अवाढव्य , विस्तीर्ण असा किल्ला , शहर , तोफ , कारखाना , खातें , पेढी इ० सरस बासन ( किल्ला ) वजनदार , पाहुणें मेले बहुत फार । - ऐपो १८५ . रखेली . [ सं . भाजन ] ( ल . ) प्रतिष्ठित मनुष्य ; बडें प्रस्थ ; दुढ्ढाचार्य . ( व . ) दागिना . अंगावर रात्रीं बासन ठेवूं नको बरं . [ सं . वसन ; वस = आच्छादन करणें ; का . बासनि . ] बासनी - वि . गाठोडें बांधण्यास योग्य ; कपडे बांधून ठेवण्याच्या उपयोगाचा ( रुमाल , खारवा इ० ).
|