|
स्त्री. गप्प ; निरर्थक गोष्ट ; पोकळ बोलणें ; थाप . [ सं . वार्ता ; हिं . ] म्ह० बातची बात व कुरापतची कुरापत . बाता उडविणें , झोंकणें , फेकणें , हाकणें - खोट्या बातम्या पसरविणें ; कंड्या पिकविणें . बाता कुटणें , खबाळणें , छाटणें , मारणें , हाणणें - गप्पा मारणें ; थापा मारणें ; निरर्थक गोष्टी बोलत बसणें . बात - बात्या , खबात्या - खबाल्या , खवाल्या , बात कुट्या , बातखोर , बाताड्या , बातेखपाल , बातेखानी , बातेफर्मास , बातोना , बात्या , बात्त्यारा , बात्येरा - वि . गप्पा मारण्याची संवय असलेला ; गप्पिष्ट ; थापेबाज ; गप्पीदास ; खोट्या बातम्या बनवून पसरविणारा ; कंड्या उठविणारा . ( गो . ) बातयॉ ; बातयो . क्रि.वि. ( व . ) लवकर ; जलद . बात स्वयंपाक कर . ०चित्त स्त्री. संभाषण ; गप्पागोष्टी . तुम्हासवें बातचित । कोण करील महाराजा । - नव १७ . १४८ .
|