|
स्त्री. एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत पंचम वर्ज्य , जाति षाडव - संपूर्ण , वादी मध्यम , संवादी षड्ज . ह्याच्या दुसर्या प्रकारांत पंचम स्वर अजिबात गाळतात , जाति षाडव - षाडव . तिसर्या प्रकारांत पंचम स्वर आरोहांत व अवरोहांत घेतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . ह्यांपैकीं पहिला प्रकार विशेष रुढ आहे . गानसमय मध्यरात्र . सोनाराची शेगडी ; काळम्मा . मध्वनाथ म्हणे बागेसरीपुढें । सोनें बरवें कुडें निवडतें । - मध्व ४९८ . [ सं . व्याघ्रेश्वरी ] ०धारजणी - ( ल . ) विशेष परिश्रम किंवा बुद्धिमत्ता यांशिवाय श्रीमंत होणें . असणें - ( ल . ) विशेष परिश्रम किंवा बुद्धिमत्ता यांशिवाय श्रीमंत होणें .
|