Dictionaries | References

निसबत

   
Script: Devanagari

निसबत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Used as ad In connection with; as belonging to; on the part of. In this sense गांवनिसबत, सर- कारनिसबत, देऊळनिसबत &c. निसबतीचा That belongs to, is connected with, bears relation to &c.

निसबत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Custody or charge of; direction or control over.
ad   In connection with; as belonging to.
निसबतीचा   That belongs to, is connected with.

निसबत     

 स्त्री. १ दिम्मत ; हवाला ; सत्ता ; हुकुमत ; देखरेख ( मनुष्य , वस्तु , काम इ० वर ). आमचा घोडा त्याचे निसबतीस आहे . २ संबंध ; नाते . - क्रिवि . संबंधाने ; संबंधी ; तर्फेचा ; बद्दल . गांव - सरकार - देऊळ - निसबत . भिल्लांचे पारिपत्य करावयाची आज्ञा सरसुभा प्रांत खानदेश निसबत नारो कृष्ण यास केली आहे . - वाडसमा २ . १५३ . [ अर . निसबत ] निसबतीचा - वि . १ मालकीचा ; नात्याचा . २ संबंधाचा ; संबंध असलेला . त्याचे निसबतीचा जाब करुन देऊं हे लिहून दिल्हे सही . - बाडबाबा २ . ३९ .
०दार वि.  दिमतदार ; ताबा , कबजा , हुकुमत , व्यवस्था ज्याच्या हाती आहे असा ; अधिकारी ; कारभारी ( मनुष्य ).
०वार वि.  १ मालकीचा ; संबंधी . २ ताब्यांत , कबजांत असलेला . - क्रिवि . ज्यांच्या निसबतीस माणसे , वस्तु इ० दिलेल्या आहेत अशांच्या नांवांच्या अनुक्रमाने , यादीप्रमाणे ( यादी इ० ). निसबद स्त्री . दिम्मत ; ताबा . निसबत पहा . निसबदीत त्याच्या राहसी सदा । - दावि ४५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP