|
स.क्रि. १ चोंदणे ; कोंदणे ; दाबून भरणे ; रेटणे ; जोराने दडपणे ; खुपसणे . कळत कळत जो काळ - व्याळमुखी प्रकट बाहुला दपटी । - मोकर्ण ६ . ७२ . २ ( ल . ) दामटणे ; पिटणे ; रवाना करणे ( घोडा , मनुष्य इ० ). ३ खडसावणे ; खडकावणे ; धमकावणे ; दहशत घालणे . ४ हिरावून घेऊन गिळंकृत करणे ; उपटणे ( दुसर्याची मालमत्ता , जागा इ० ); जबरीने उपभोगणे ( स्त्री , बायको ); आत्मसात करणे ; डल्ला मारणे ; गट्ट करणे ; अफरातफर करणे ; दडपणे ; गिळंकृत करणे . ५ ( वाद किंवा युद्धात ) दुसर्यास जिंकणे . [ दडपणे ] दपटून जेवणे - आकंठ , घशाशी येईल इतके जेवणे . दपटून निजणे - सपाटून झोंप घेणे . दपटून शिरणे - जोराने आंत घुसणे . दपटशहा , दपटशाहा , दपटशा - पु . १ जोराची खडसावणी ; खरडपट्टी ; भोसडपट्टी ; भयंकर धाक , तंबी , धमकावणी ; भीति घालणे ; धमकावणे ( क्रि० देणे ; बसणे ). २ गर्दी ; तगादा , निकड , ( कामाची ). ( क्रि० बसणे ; पडणे ; लावणे ; लागणे ; घालणे ). जोराची निकड लावणे ; बोकांडीस बसणे . ( क्रि० काढणे ; घालणे ; देणे ). सामान्यतः कर्माच्या षष्ठीबरोबर जसेः - घोड्याचा - बैलाचा - चाकराचा दपटशहा काढला . दपटशा बेरीज देणे - घाईने व सरासरीने बेरीज करणे . [ दपटणे ] दपटशाही - स्त्री . तंबी ; धमकावणी . [ दपटणे ] दपट्या - वि . १ ( अन्न ) दडपून भरणारा , कोंबणारा , खाणारा ; आकंठ जेवणारा . २ हिरावून घेऊन पळून जाणारा ; जुलुमाने घेऊन आत्मसात करणारा . ३ वाटेल ते काम कसे तरी दडपून पुरे करणारा . [ दडपणे ] दपटश्चमे - वि . दपट्या पहा . - क्रिवि . दपटून .
|