|
क्रि.वि. १ ( एखादा जिन्नस तळतांना , फोडणी देतांना , भाजतांना होणार्या ) तडतड , अशा आवाजाने ; सपाट्याने छडी मारली असतां , एकदम बंदूक उडविली असतां , एखादा पदार्थ खडखडत असतां होणार्या तड तड अशा आवाजाने . २ ( जोराने , आवेशाने , घिसाडघाईने एखादा जिन्नस ) फाडतांना , फोडतांना , तोडतांना , चावला जात असताना , लचके तोडले जात असतांना , कुरतडतांनां होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० तोडणे ; बोचकरणे ; लुंचणे ; चावणे ; खाणे ; डसणे ; खाजवणे ; फाडणे ; फाटणे ). क्रव्यादाही तडतड तोडुनियां भक्षिलाचि मत्स्यप हा । - मोस्त्री ४ . ६२ . ३ चिरडीने ; तुसडेपणाने ; वसकन ( बोलणे इ० ); फडाफड बोलून ; कडकडून ; तोंड सोडून ( रागे भरणे ; खरडपट्टी काढणे ). ४ चलाखीने ; झटदिशी ; चपळाईने ; उत्साहाने ( करणे , बोलणे , हालचाल करणे ). [ ध्व . तड द्वि . ] ( पोटांत ) तडतड , तडतडां तोडणे - ( एखाद्याविषयी ) कळवळा येणे ; कीव येणे ; मन द्रवणे ; आंतडे तुटणे .
|