Dictionaries | References

डौर

   
Script: Devanagari

डौर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अस्थि-पंजर

डौर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tabor shaped like an hourglass. 2 A little rattle, a windlass &c. of this shape. 3 A dovetailing of this form; a hold of iron to connect two stones or timbers.

डौर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अंगरखा, खुळखुळा, डमरू

डौर     

 पु. उपहास . ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो । - ज्ञा १३ . ८२५ .
 पु. झगा . केली विजार वरि डौरहि मौन सेवी । - र१० .
 पु. १ डमरु ; एक वाद्य . याचा आकार मध्ये बारीक व रुंद तोंडाच्या मापी अच्छेरासारखा व दोन्ही तोंडे कातड्याने मढविलेली असून ती बारीक सुतळीने जोडलेली असतात . वाद्याचा स्वर चढा करण्याच्या कामी या सुतळीचा उपयोग होतो . याजसाठी डौर म्यां धरियेले हाती । तुका म्हणे तुम्ही गांठी सोडायची खंती । - तुगा २९४ . २ लहान मुलाचे खुळखुळा इ० खेळणे . हे डमरुच्या आकाराचे असते . ३ गलबतावर नांगर वगैरे ओढून घ्यावयाचे यंत्र ; गलबत किनार्‍यावर ओढण्याचे यंत्र ; डेकरी ; हात . ४ डमरुच्या आकृतीची कळाशी ; दोन लांकडे अथवा फरशीचे दोन दगड एकत्र जोडण्याकरिता केलेला लोखंडाचा सांधा .
०कार वि.  डौर वाजविणारा भिकारी .

डौर     

डौर वाहणें
उपहास करणें. बहिरेपणाचे मक्त जे भराडी हे डौरावर रूपकाची गाणीं जी म्‍हणतात त्‍यांचा सूर उपहासपर असतो यावरून. ‘ते आइकोनि डौर वाहे। विद्बांसु जो।’ -ज्ञा १३.८२५. ‘डौर वाहूनि सांगणें निजहितार्थ। या कारणें मी डौरकार जालों।’ -एकनाथ भारूड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP