|
न. ( कु . ) बरड , वरकस जमीन . न. डौर वाजवून व नाचून देवापुढें भराड्यानें केलेलें भजन , गोंधळ . कथा लावणी गोंधळ भराड गीत गाती अबळा । - पला १ ३३ . ( व . ) कुणबी लोकांत बकरा वगैरे मारुन केलेलें नवसाचें जेवण . भराडा , डी - पु . गोसाव्यांचा एक पंथ ; डौरी ; गोसावी ; भराड - गोंधळ घालणारा . अठरा अखाडे पहा . भराडी , गोंधळी , मुरळ्या , वाघे हे गांवांबाहेर पालें देऊन राहतात . यांच्याजवळ गाई , म्हशी , बैल , टोणगे , कोंबड्या बकरीं असतात व तीं ते विकतात . हे खंडोबा , बहिरोबा इ० देवांचीं गाणीं , पोवाडे व लावण्या गातात . कांहीं बैठकीचें गाणें , तमाशा करितात . - गांगां १२० . पुजारी . [ सं . भरटक ; भरवाड पहा . ] भराडी गौर - स्त्री . ( ना . ) श्रावण महिन्यांतील मुलींचा गौरीचा उत्सव व खेळ वगैरे . भराडी वोवसा - पु . एक व्रत . विधिमंत्रें सुशील स्नान । सतीनें केलें आपण । मग भराडी वोवसा दान । करिती जाहली । - कथा ३ . १२ . ७३ .
|