Dictionaries | References

ठेप

   
Script: Devanagari

ठेप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭhēpa f Stoppage through collision or contact; the state of being arrested in progress by an opposing body. v खा, बस. 2 fig. Limit, bound, boundary; a place of resting or pausing. Ex. भांगाचे दिवसांत समुद्राची ठेप इतकीच; पंचाइतीची ठेप कोठपर्यंत आली? 3 An appointment or engagement: also an appointed or assigned time, a term. v कर, ठरव. Ex. उद्या संध्याकाळीं तुम्हास भेटेन असी त्यानें ठेप केली आहे; त्याची ठेप भरली; पंचायतीनें त्याजपासून ठेप लिहून घेतली. ठेप देणें To apply some cause of obstruction or stoppage; to fix some limit or term. ठेपेस नेणें or लावणें To bring or put to its proper resting place; to fix or settle. ठेपीचा Regular, orderly, correct, restrained, observing limit, law, or rule--person, trader, business. Also ठेपेचा.

ठेप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Stoppage through collision or contact,
-खा, -बस.   Limit, bound, boundary. An appointment or engagement.
ठेप देणें   To apply some cause of obstruction or stoppage.
ठेपेस नेणें, लावणें   To bring or put to this proper resting place.
ठेपीचा   Regular, orderly, correct.

ठेप     

 स्त्री. १ टक्कर , भेट , अडथळा , संबंध किंवा संघर्षण यांच्यामुळें दोन गतिमान पदार्थाचा अटकाव ; स्थिरता ; विरुध्द गतीनें येणार्‍या वस्तूंच्या गतीचा निरोध . ( क्रि० खाणें ; बसणें ). २ ( ल . ) सीमा ; मर्यादा ; थांबण्याचें ठिवाण ; हद्द . पंचायतीची ठेप कोठपर्यंत आली ? ३ संकेत ; वचन ; नेमलेली वेळ ; ठरविलेला काळ ; मर्यादित मुदत . ( क्रि० करणें ; ठरविणें ). उद्यां सकाळीं भेटेन अशी त्यानें ठेप केली आहे . कालदेशावधि नियमपूर्वक केलेला कार्यनियम . ४ अपराधी माणसास कांहीं नियमित कालपर्यंत सरकारांतून तुरुंगांत जो प्रतिबंध करतात तो ; कैद ; शिक्षा . ५ ( लाकूडकाम ) सांध्याचा एक प्रकार . - मॅरेट २८ . ६ पंचायतप्रकरणीं वादीप्रतिवाद्यांपासून लिहून घ्यावयाची कलमवार यादी . ( वाप्र . ) ठेपदेणें - अडथळा आणणें ; मर्यादित करणें ; मुदतबंद करणें .
०विणें   उक्रि . १ गति बंद करणें ; मार्गास अडथळा करणें स्थिर करणें हालचाल करणार्‍या वस्तूच्या मार्गांत अडथळा आणून अथवा विरोध करून ती थांबविणें , स्थिर करणें . २ दुसर्‍यावर टेकेल असें ठेवणें एखाद्याला आधारभूत किंवा एखाद्याच्या आश्रयानें ठेवणें . ३ एखाद्या दिवसापर्यंत नेमणें ; ठराविक काळीं योजणें . [ ठेपणें ]
०लणें   अक्रि . १ आघात किंवा अडथळा यामुळें थांबणें ; वाढलें जाणें . २ - उक्रि . भोंदणें ; भुलथाप देणें ; चाळवण्या दाखविणें ; हळू हळू वश करणें ; हुरळविणें ; गोंजारणें आशा लावून फसविणें . ठेपेस नेणें , लावणें - जागच्या जागीं आणणें ; पूर्वस्थळीं आणणें , नेमणें ; ठरविणें . सामाशब्द -
०ठाप  स्त्री. नियमितपणा ; ठराविक स्थिति ; टापटीप ; ठामपणा ; नेमकेपणा .
०राई  स्त्री. टापटीप ; व्यवस्था ; व्यवस्थितपणा ; योग्ययोग्यता ; मर्यादा ; सावधगिरी ( वागणूक भाषण , कृत्य , शिक्षण इ० ची ). ठेपीचा , ठेपेचा - वि . १ मर्यादा किंवा कायदा पाळणारा ; व्यवस्थित ; टापटिपेचा ( मनुष्य , व्यापार , धंदा ). २ थेटचा अखेरपर्यंत जाणारा ( प्रवासी ), पुरणारें ( काम ).

ठेप     

ठेप देणें
अडथळा आणणें
प्रतिबंध करणें.
मर्यादित करणें
अटी घालणें.
मुदतबंद करणें
कालावधि घालणें
मुदत ठरविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP