Dictionaries | References

झडी

   
Script: Devanagari

झडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A long-continued fall of rain. 2 A lingering, wasting disease; tabies, marasmus, consumption. 3 A thatched frame. Used to protect an open building against rain, a tattie.

झडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A long-continued fall of rain. A lingering, wasting disease.

झडी     

 स्त्री. १ पावसाची एकसारखी वृष्टि ; झड . २ क्षयरोग ; झुरणी ; रेंगाळत राहणारा , क्षीण करणारा रोग . झडी पडलें मी कमळण भ्रमरा केव्हां भोग देसी । - होला १७५ . ३ ( झाडें इ० कांच्या पानांची ) गळती ; जीर्ण होऊन गळून पडणें . वृक्षासि होय पानझडी । - एभा ३ . १५५ . ४ उडी ; झडप . तुका म्हणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं । - तुगा १६११ . ५ पावसापासून रक्षण करणारें दार ; खिडक्या इ० कांवरील झडपण , तट्टी इ० [ झडणें ]
 स्त्री. १ घाई ; त्वरा . २ उत्साह ; उमेद . ओढीना न झडी धरूनि तुळवी कोणी न तोली बरा । - आसी . ५० . [ सं . झटिति ; प्रा . झडि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP