Dictionaries | References

जेर

   
Script: Devanagari

जेर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पराजित, खेड़ी, इज़ाफ़त

जेर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : इजाफत

जेर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v हो or जेरीस-आणणें-येणें.

जेर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Inferior or feebler, of less power or dignity, overcome by, exhausted, enfeebled, reduced by (disease, poverty &c.) Opp. जबरदस्त.

जेर     

वि.  १ कमी प्रकारचा , योग्यतेचा ; अशक्त ; लेचापेचा . २ हतवीर्य ; दमलेला ; भागलेला ; थकलेला ; त्रस्त ; हैराण ( आजार , दारिद्रय इ० नीं ). ( क्रि० होणें , आणणें ). पडश्यानें त्याला भारी जेर केलें . ३ चीत ; पराभूत ; निर्बल . त्याशत्रूखालीं तो जेर आहे . ४ हस्तगत . तें स्थळ जेर करावें . - सभासद ५६ . [ फा . झेर ] जेरकडी - स्त्री . लगामाची कडी .
०जप्त वि.  हस्तगत ; स्वाधीन . पाण्यांत गड बसविले म्हणजे दर्या जेर्जप्त आहे . - चित्रगुप्त ८७ .
०जबर   जबरी - वि . १ डाव्या अंगाचा जबर व उजव्या अंगाचा जेर अशा संकेतानें खेळण्याचा गंजिफांचा एक खेळ . २ दुर्बळ , सबळ त्यास कळों न देतां बिघाड करावा ; मग जेर - जबर कोण किती तें पहावें - गोखंचिशाब ८० .
०जबरी  स्त्री. ( चुकीनें ) जोरजबरी ; जुलूम .
०दस्त वि.  १ जेर अर्थ १ पहा ; दीन ; गरजु ; २ कमजोर ; दुर्बल . तिकडून इराणचे शाहानें जेरदस्त केलें . - इमं २६० . याच्या उलट जबरदस्त . ३ जेरजबर - री पहा . ४ काबीज ; जेरजप्त . ममताई देशपांडीण इणें तमाम प्रगणा जेरदस्त केला . - भजनीभारूड , अर्जदास्त . पृ . ७ . [ फा . ]
०दस्ती  स्त्री. १ विपन्नावस्था ; दुर्बलता . २ गंजिफांचे खेळांतील एक संज्ञा . [ फा . ]
०बार वि.  त्रस्त ; हैराण . तेथें जाऊन व्यर्थ जेरबार व्हावें , वरकड अर्थ नाहीं . - दिमरा १ . २८७ . [ फा . झेर्बार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP