|
वि. चालू . ( फा .) स्त्री. १ चालू असलेलें , विद्यमान सरकार , कायदा . २ कोणताहि सुरू असलेला व सार्वजनिक वसुलांतून निराळा केलेला अम्मल ( वसुलाचा भाग ); गरदेशमुखी आणि चौथ अम्मल हीं ह्या सदराखालीं येतात . हीं उपभोगणार्यांना जारी इनामदार म्हणतात . ३ अधिकाराचा काल ; सत्ता , अम्मल यांचे दिवस ; चलती . ४ कसोशी . ( क्रि० करणें ). - वि . १ चालू ; ह्यात ; विद्यमान ; इनाम चाकरी , वर्षासन , सरंजाम इत्यादि शब्दांशीं हा जोडतात २ सुरू . त्याजकडे बोलणें चालणें ही जारी आहे . - रा ५ . १८९ ३ दुसर्या - तिसर्यानें लागवडींत आणलेली ( जमीन ). [ अर . ] ज्वारी पहा . ०करणें सुरू , प्रचलित करणें . कंपनीच्या नांवाचा नवा रुपया हिंदुस्थानांत जारी करण्यांत आला . - सन १८५७ . १०६ . जारीत आणणें - प्रचारांत आणणें ; जारी करणें पहा . ०अम्मल पु. जारी अर्थ १ , २ . पहा . चौथ , सरदेशमुखी पहा . ०चिठ्ठा पु. जारी अम्मलाचा ( वसुलाच्या विभक्त भागांचा ) हिशोब . ०वसूल , वहिवाट , हिशोब - स्त्रीपु . सार्वजनिक पैशाचा चालू हिशोब जारीनें - १ जोरानें ; वेगानें . २ कसोशीनें . बाकी , वहिवाट , हिशोब - स्त्रीपु . सार्वजनिक पैशाचा चालू हिशोब जारीनें - १ जोरानें ; वेगानें . २ कसोशीनें .
|