Dictionaries | References

चिन्ह

   
Script: Devanagari

चिन्ह     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चिह्न, निशान

चिन्ह     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of a disease.

चिन्ह     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A mark; a spot; a sign. Pranks.

चिन्ह     

ना.  ओळख , खूण , गमक , दाखला , निशाणी , परवल , लक्षण , संकेत ;
ना.  अभिज्ञान , मुद्रा , ठसा , छाप .

चिन्ह     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खूण, ठसा, ठसा

चिन्ह     

 न. १ ( जेणें करून विवक्षित प्रकारानें कोणी एक मनुष्य , वस्तु , पदार्थ ओळखला जातो अशी ) खूण ; निशाणी ; उ० मस , तीळ , डाग , ठिकें इ० . २ ( साहचर्य , समानाधिकरण्य इ० नियमांमुळें कोणी एका गोष्टीचें , गुणादिकांचें ) ज्ञापक ; गमक ; अभिज्ञान ; व्यंजन ; उ० क्रॉस ; स्वस्तिक ; बिल्ला इ . दक्षिण वायु सुटला हें पर्जन्याचें चिन्ह दिसतें . या स्वारींत छत्रचामरादि राजाचीं चिन्हें दिसत नाहींत त्यावरून येथें राजा नसेल . तेव्हां हें कांहीं मला धड चिन्ह दिसत नाहीं . - रत्न ३ . ३ . ३ ( गणितशास्त्र , रसायनशास्त्र ) पारिभाषिक , सांकेतिक खुणा . उ० अधिक ( + ); उणे ( - ); गुणिलें ( x ); भागिलें ( ÷ ) इ० ४ ( लांकडाच्या फळीनें , बंदुकीच्या बारानें , दिली जाणारी ) सूचना . ५ अवलक्षण , लोकविलक्षण कृति ; चाळा ; खोडी . अशीं काय चिन्हें आरंभलीस . ६ अवलक्षणी , विचित्र , खोडकर , द्वाड , लोक विलक्षण असा मनुष्य , मूल . हा मुलगा एक चिन्हच आहे . ७ ज्ञापक अगर गमक गोष्ट , वस्तु निदानाच्या पांच प्रकारापैकीं चौथा प्रकार ; ( रोगाचें ) बाह्य लक्षण उ० पिवळे डोळे , कांटेरी जीभ इ० नाना रोगांची परीक्षा । नाना चिन्हांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे । - दा ५ . ५ . १५ . चिहनित - वि . खूण केलेला ; डाग , ठिपका , असलेला ; आकृति कांढलेला ; ज्यावर चिन्ह आहे असा . [ सं . ]
चिहन पहा .

चिन्ह     

चिन्हा चाळ्याची, भोकरबाळ्याची
नखरेबाज, चवचाल स्‍त्री.

चिन्ह     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : निशान, चिह्न

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP