|
उ.क्रि. १ विवक्षित स्थळीं असलेला ( पदार्थ , मनुष्य ) दूर करणें ; काढून टाकणें ; हांकलणें ; हांकून देणें . यांना एकदा येथून घालवून दिलें होतें . - विक्षिप्त २ . ४३ . २ धाडणें ; पाठविणें ; पिटाळणें ; मी गडी गांवास घालविला आहे , आतांच येईल . ३ ( आळ , आरोप इ० कांचें ) निराकरण ; निरसन ; निरास करणें , काढून टाकणें ; ( प्रायश्चित इ० नीं पाप इ० ) क्षालन करणें ; नाहीसें करणें ; धुवून टावणें . ४ ( पैसा , संपत्ति इ० ) उधळणें ; उडविणें ; बेफामपणें खर्च करणें . ५ ( वेळ , आरोग्य , तारुण्य इ० ची ) नासाडी करणें ; आळसानें दवडणें ; नष्ट करणें . ६ काढणें ; कंठणें ; अतिक्रांत करणें . घालवि दिवसा वनांतरी बसुनि । - विवि ८ . ६ . १२० . ७ ( अब्रू , पत , संधि , लाभ इ० ) गमावणें . ८ ( काम , धंदा इ० ची ) नासाडी करणें ; चुथडा करणें ; विघात करणें ; मातेरें करणें ; धुळीस मिळवणें . ९ ( गणित ) ( एका संख्येंतून दुसरी संख्या ) वजा , बाद करणें ; वगळणें ; काढून टाकणें ; कमी करणे . विसांतून पंधरा घालविले तर पांच राहतात . १० ( एखाद्या मनुष्यास त्यास जावयाच्या ठिकाणापर्यंत किंवा मार्गाच्या कांहीं अंतरापर्यंत सोबत ) पोंचविणें ; करणें ; निरोप देणें ; बोळविणें . सासु पती कांता मूल येक करून । गृहासी नेऊन घालवीली ॥ - रामदासी २ . १३८ . ११ ( दिवा इ० ) मालविणें ; विझविणें . रदनिके , घालविलास दिवा ? - मृ १३ . [ घालणें ]
|