Dictionaries | References

घमघम

   
Script: Devanagari

घमघम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. मोगरीजवळून गेलों तर घ0 वास आला or सुटला. 2 sweetly, flowingly, swimmingly, readily. Ex. छडी लागे चमचम विद्या येई घ0; गाय घ0 दूध देती or दूध घ0 पडतें.

घमघम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   A fanciful word expressive of diffusedness and strength. sweetly, swimmingly. readily.

घमघम

  पु. ( गो . ) घमघमाट पहा . - क्रिवि . १ अतिशयित सुवासाच्या दर्पाचें निदर्शक क्रियाविशेषण . मोगरीजवळून गेलों तर घमघम वास आला - सुटला . २ एकदम ; भरपूर ; सुरळितपणें ; संतोषानें . गाय घमघम दूध देते . दूध घमघम पडतें . ३ धडकून ; जोरानें . छडी लागे चमचम विद्या येई घम घम . [ घ्व . प्रा . घवघव ] घमघमणें - अक्रि . अतिशय सुवास येणें ; सुगंधानें , फुलादि दरवळणार्‍या वासानें युक्त होणें . कीं तें वैराग्यवल्लीचीं सुमनें । प्रेमसुवासें घमघमती ॥ येथें कायहो फुलें घमघमतात . घमघमाट - पु . वासाची अतिशयता ; मधुरउग्र वासांचा संयोग ; सुगंधाचा अतिरेक - दर्प ; फार दरवळणारा सुगंध ; फुलांचा घमघमाट व झर्‍यांचा झुळझुळ आवाज यांपासून मोठा आवाज होई - पाव्ह ३७ . घमघमीत - वि . उग्र , मधुर आणि दरवळणारा ( सुगंध ); घमघम सुवासयुक्त ( फोडणी इ० पदार्थ ); खमंग . आजची भाजी घमघमीत आहे . [ घमघम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP