Dictionaries | References

उभा

   
Script: Devanagari

उभा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
loosely or carelessly around the middle. The two phrases also denote respectively two modes of putting on the धोतर amongst males.

उभा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Erect. Lying along, not across. Standing up. Whole.
उभा करणें   Stop; suspend; realize or make good.

उभा     

वि.  खडा , ताठ , न वाकलेला ;
वि.  जागृत , तीव्र , पक्का , सतत ( दावा );
वि.  चालू , सूरू असलेला ( धंदा );
वि.  अखिल , संपूर्ण , सर्व ( उभ्या भारतात );
वि.  न कापलेले ( शेत , पीक );
वि.  उत्सुख , तयार ;
वि.  कृतिशून्य , स्तब्ध .

उभा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  क्षितिजाला समांतर नसलेला   Ex. एक उभी व एक आडवी रेष ओढ.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
खडा
Wordnet:
asmথিয়
bdगोथों
benখাড়া
gujઊભું
hinखड़ा
kanಲಂಬವಾದ
kasسیٚود
kokउबें
malലംബമായ
mniꯑꯌꯨꯡꯕ
oriଆନୁଲମ୍ବିକ
panਖੜਾ
sanलम्बरेख
telనిలువుగావున్న
urdکھڑا , قائم , استوار
adjective  न बसलेला   Ex. उभा असेलेल्या माणसाला खुर्ची दे बसायला
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdआथिंनि बोलोयाव गसंग्रा
benদণ্ডায়মান
gujપદસ્થ
hinपदस्थ
kanನಿಂತ
kasاۄعہدٕدار
kokउबो
malകാലിൽ നിൽക്കുന്ന
oriପଦସ୍ଥ
panਪਦਸਥ
sanपदस्थ
tamநிற்கிற
telపదస్థయైన
urdپیروںپرکھڑا
See : सरळ, सगळा

उभा     

वि.  
ताठ ; वर ; खडा ; आडवा नसलेला ; न वांकलेला ; न बसलेला . उभा राहून किती वेळ बोलशील ? ये , इथें झोपाळ्यावर बैस .
सरळ दिशेंत असलेला ; लांबीच्या अनुषंगानें सरळ रेषेंत असणारा ( रस्ता ). याच्या उलट आडवा ( रस्ता ).
चालू ; सुरु असलेला ( धंदा वगैरे ). माझें घर बांधण्याचें काम उभें आहे .
न कापलेलें ; शेतांत उभें असलेलें ( पीक वगैरे ). शेतांतील उभें पीक शत्रूनें कापून नेलें . .
तयार ; उत्सुक ; पुढें आलेला ; सिद्ध . त्याचें घर विकत घेण्यास कोणी उभा रहात नाहीं .
सतत ; अढळ ; जागृत ; पक्का ; तीव्र ( द्वेष , दावा वगैरे ). त्या दोघांमध्यें उभा दावा आहे . .
संपूर्ण ; सर्व ; अथपासून इतिपर्यंत ( संवत्सर , साल , वर्ष वगैरे ). उभ्या वर्षांत धंद्यामध्यें कांहीं फायदा झाला नाहीं . .
सारखा ; चालू असलेला ; खळ न पडणारा ; फार वेळ टिकणारा ; अविरत ( पाऊस , वारा वगैरे ). उभ्या पावसांत शेतलावणीचें काम चालू होतें .
सरळ धारा पडत आहेत असा ( पाऊस ).
० थेट समोरुन येणारा ; तोंडावर येणारा ; विरुद्ध दिशेकडून येणारा ( वारा वगैरे ). वारा उभा असल्यामुळें गलबताची गति खुंटली , मंद झाली .
गति नसलेला ; थांबलेला ; स्थिर . [ सं . ऊर्ध्व ; प्रा . उब्भ ; सिं . उभो ; बं . उबु ]
०करणें   क्रि .
थांबविणें ; गति बंद करणें ; स्तब्ध करणें ; गाडी उभी कर . .
बंद करणें ; तात्पुरता थांबविणें ; कांहीं काळ थोपविणें ( धंदा , काम वगैरे ). मंदीमुळें सध्यां धंदा उभा केला आहे .
रचणें ; उभारणें ; तयार करणें . पोलिसांनीं खोटा खटला उभा केला .
( बायकी ) धुतांना लांब वस्त्र एका पदरापासून दुसर्‍या पदरापर्यंत सारखें करुन घेणें .
उत्पन्न करणें , आणणें . शिवाजीमहाराजांच्या नेत्रांतून देखील अश्रू उभे केले . - इंप १०६ .
आडवी पडलेली वस्तु लंबरेषेंत ठेवणें . समई आडवी पडली आहे ती उभी कर पाहूं !
०होणें   थांबणें ; तात्पुरता बंद होणें ; विश्रांति घेणें .
०धरणें   निर्बंधात ठेवणें ; कडक शिस्तींत वागविणें ; जांचणूक करणें ; त्रास देणें ( धनकोनें रिणकोस , मुलानें आईस वगैरे ). केव्हांपासून यानें मला अगदीं उभें धरिलें आहे , जरा घे तरी ! .
०जाळणें   अत्यंत हाल करणें ; अतिशय त्रास देणें ; छळणें .
०ठाकणें   उत्पन्न होणें ; समोर येणें . संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला । - दा १२ . ९ . २४ .
०नाहणें   सर्वांग भरुन येणें , पाझरणें , निथळणें ( घाम , रक्त वगैरेनीं ).
०राहणें   
मिळणें ; प्राप्त होणें ; संपादन करणें . व्यापारांत घातलेलें माझें भांडवल अद्यापि सारें उभें राहिलें नाहीं . .
घडणें ; जवळ येणें ; निकट येणें ( एखादी गोष्ट किंवा कृत्य ); प्राप्त होणें ; आवश्यक होणें .
साहाय्य करण्यास पुढें येणें , तयार होणें , सिद्ध होणें . बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे ॥ - दा १९ . ४ . ११ .
एखाद्या संकटांतून वर येणें ; नशीब काढणें .
पोटांत गोळा उभा राहणें ; संकट येणें , उपस्थित होणें .
आड येणें ; अडचण , प्रतिबंध होणें ; पुढें येणें . त्यावेळीं एक गोष्ट उभी राहिली , तेणेंकरुन माझा बेत जागच्याजागींच राहिला . माझ्या मुलीचें लग्न उभें राहिलें आहे , तुम्हाला द्यावयाला मजजवळ पैसे नाहींत .
उत्पन्न होणें ; मिळणें ; प्राप्त होणें ( किंमत वगैरे ). या मालाचे रुपये पांच हजार उभे राहिले कीं , माझे वडील भाग्योदय मानतील . - विवि . १० . ५ . १९७ .
अनुकूल होणें . उभे राहिलें भाग्य बिभीषणाचें । - राक १ . ७१ .
०इंद्र   - पुन्हां सुरुवात करणें ; नव्यानें आरंभ करणें ( काम , धंदा वगैरेस ).
करणें   - पुन्हां सुरुवात करणें ; नव्यानें आरंभ करणें ( काम , धंदा वगैरेस ).
०छेद  पु. ( गणित , स्थापत्य , चित्रकला ) एखादी वस्तु उभी ( ओळंब्यांत ) वरपासून खालपर्यंत कापली असतां दिसणारें दृश्य .
०तांब्या  पु. राजापुराकडील उभंट आकाराचा पितळेचा किंवा तांब्याचा लोटा .
०दांडा  पु. 
उभा , सरळ खांब .
( ल . ) सरळ व्यवहार ; सरळ वर्तन ; युक्तीचें , कुशलतेचें वर्तन . [ उभा + दंड ]
०दावा  पु. हाडवैर ; अक्षय , कायमचें वैर . म्ह० जावा जावा , उभा दावा . ( उभे ) दोन प्रहर पु . उभीदुपार पहा . आपल्या झोपड्यांवर उभ्या दोन प्रहरीं चांगलें ऊन पडतें . - पाव्ह २७ .
०दोरा  पु. धांवदोरा ; कच्ची शिवण ; टीप याच्या उलट .
०नासणें   सर्व नाश होणें ; तात्काळ नासणें . जे शब्दीं वदोनि उभा । संसारनासी ॥ - दा १ . २ . ९ .
०पाहारा  पु. 
खडा पाहारा ; अत्यंत काळजीपूर्वक , डोळ्यांत तेल घालून केलेली राखण .
सारखें उभें रहाणें , बसावयास फुरसत न मिळणें ; एकसारखे कष्ट ; विश्रांतीचा अभाव . दिवसभर्‍याच्या उभ्या पाहार्‍यांत अंग भरुन येऊन रात्रीं मेलं केव्हां एकदां आडवी होईन असं होऊन गेलं . - नाट्यछटा ( फाटक ) २ .
( ल . ) एकसारखी केलेली चाकरी , सेवा ; एखाद्या आजार्‍याची एकसारखी केलेली सारखी शुश्रूषा .
०पाऊस  पु. मोठा , सरळ धारांनीं पडणारा पाऊस ; न खळणारा पाऊस .
०बाजार  पु. 
या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व बाजार ; सगळी बाजारपेठ . तूं दिलेल्या रंगाची लोंकर उभ्या बाजारांत मिळत नाहीं . .
भरबाजार ; बाजाराचा मध्य भाग ; चव्हाटा . उभ्या बाजारांत कथा । हें तों नावडे पंढरीनाथा ॥
०मा्र्ग  पु. 
राजरस्ता ; सार्वजनिक रस्ता ; रहदारीचा रस्ता ; मोठा रस्ता ; हमरस्ता .
या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व , सगळा रस्ता .
सरळ रस्ता ; आडवा नसलेला , वांकडातिकडा नसलेला रस्ता .
( ल . ) सरळ , प्रामाणिकपणाचें वर्तन ; शहाजोग व्यवहार . उभ्यामार्गानें जाणें , येणें - न . सरळ मार्गानें , न थांबतां , वांकडेंतिकडें न जातां जाणें .
०माल  पु. तयार झालेलें , पण न कापलेलें शेतांतील पीक . उभ्या मालाची पाहाणी स्त्री . शेतांतील पिकाचा अंदाज . म्ह० उभ्यानें यावें ओणव्यानें जावें = वेळ प्रसंग पाहून वर्तन करावें , नम्रतेनें वागावें .

उभा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
उभा   (in comp. for उभ above).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP