Dictionaries | References

उठणें

   
Script: Devanagari

उठणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उठणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   rise, rise against. ache. stand up against maliciously.
उठून जाणें   run away.
रोज उठून   With constant, daily, or regular repetition.

उठणें

 अ.क्रि.  
   उभे राहाणें . बसणें याच्या उलट .
   ( ल . ) वर येणें ; आकाशांत वर जाणें ( धूर , धुराळा ).
   जागें होणें ; शुध्दी वर येणें ( झोपेंतून , मूर्च्छेतून ).
   बरखास्त होणें , संपणें ( सभा , बैठक वगैरे ). चार वाजले म्हणजे कचेरी उठते !
   ( सैन्य वगैरे ) चालू होणें ; बाहेर पडणें ; सज्ज होणें ; हल्ला करणें . भट दशसहस्त्र उठले जे आज्ञाकर सुयोधनाचे हो ! - मोभीष्म ६ . ६१ .
   उडून जाणें ( एखाद्यावरील मन , प्रेम ); उद्विग्न होणें ; त्रासणें ; कंटाळणें .
   बंड करणें ( एखाद्या विरुध्द ); सामना देण्यास तयार होणें . दुर्जन ज्याचें अन्न खातो त्याजवरच उठतो .
   स्पष्ट दिसणें ; उमटणें ( ठसा , रंग , छाप वगैरे ). उत्तम गुण तत्काळ उठे । - दा १९ . ६ . २० .
   वर येणें ; दिसावयास लागणें ; बाहेर पडणें ; उदभवणें ( पुरळ , साथ , संकट , बातमी वगैरे ).
   दुखावयास लागणें ; ( डोकें , कपाळ , मस्तक ; शीर , त्याचप्रमाणें दाढ , दांत , कान , हात , पाय , या संबंधींही क्वचित उपयोग करतात ). निघाल्या देवी आणि गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर । - दा ३ . २ . २६ .
   ताजेंतवानें होणें ; फुलणें ; टवटवीत होणें ; आनंदित होणें ; ( मनुष्य , प्राणी , वनस्पती वगैरे ); खुलून दिसणें ( रंग वगैरे . )
   आकसानें आळ घेणें ; कुभांड रचणें ( मनुष्यावर ; घराण्यावर वगैरे ).
   खुणा पडणें ; उठून दिसावयास लागणें ( वण , वळ , चाबकाचा मार , दांताचा चावा ).
   करवणें ; उरकणें ; पार पडणें ( काम वगैरे ). माझ्याच्यानें पहिल्यासारखें कामही उठत नाहीं . - विवि ८ . ८ . १५३ .
   वस्ती वगैरे उठून जाणें ; ओसाड पडणें .
   उत्पन्न होणें . उठती घनपटळें । नाना वर्णे । - ज्ञा ८ . ३० . शब्द पडसाद उठला । म्हणे कोण रे बोलिला ।
   ( व . ) खर्च होणें ; खलास होणें ; संपून जाणें . इतके तांदूळ आजच्या आज उठतील . म्ह० उठणे - वाल्याचें उठतें कोठीवाल्याचें पोट दुखतें .
   पूर येणें . जसें महाप्रळयीं जळ । उठलिया भरे ब्रह्मगोळ । - विउ ११ . ८६ .
   वाढणें . चार शिंपणी लागोपाठ सांपडतांच पहिल्यापेक्षां चार बोटें भाजी उठली .
   प्रवृत्त होणें ( वाईट करण्यास ). मी इतकें बोलतांच तो जीव घ्यावयास उठला .
   क्षोभ होणें ( पित्तादिकांचा ).
   नवीनच गोष्ट प्रसिध्द होणें ; प्रचारांत येणें . बारा वर्षांचे मागलें देणेंघेणें कोणी देऊं नये , मागूं नये असें हें अलीकडे नवेंच उठलें .
   एखाद्यानें लौकिकानुरुप मर्यादा सोडून वर्तन करणें .
   उभें होणें ; तयार होणें ( इमारत वगैरे . ) तैं राजवाडा उठे . - विक ११ .
   वाटणें ; मनांत येणें . झोंबी घ्यावी ऐसें उठे । - दा २ . ६ . १५ . [ सं . उत + स्था ; प्रा . उठ्ठ ; सिं . उथणु ; जिप्सी सीगन उष्टी ; जिप्सी फ्रेंच उठ्ठी ] उठून जाणें -
   परवानगीशिवाय निघून जाणें ; पळून जाणें ; रागानें चालतें होणें . त्याची थट्टा सुरु होतांच तो मंडळींतून उठून गेला . माणसांतून उठून जाणें -
   रीतभात सोडणें ; अनीतीच्या मार्गाला लागणें .
   परपुरुषाबरोबर निघून जाणें ( स्त्रियांच्या बाबतींत ). खरेंच कां रुपमाया सेनापती उठून गेल्या . - बाय ४ . ३ . उठून दिसणें - स्पष्टपणें नजरेस येणें . नित्य उठून , रोज उठून - क्रिवि . दररोज नेमानें ; नित्य ; रोजच्या रोज . उठला ठाव देववत नाहीं - उठून जेवावयाचें पानहि मांडतां येत नाहीं ( इतक्या निर्बलतेचें द्योतक ).

उठणें

   उठतां बसतां-पडल्या
   उठल्या बसल्यासुटल्या
   १. हरघडी
   एकसारखे. २. वेळ अवेळ, योग्य अयोग्य या गोष्टीचा विचारकरतां.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP