|
क्रि.वि. वर ; हवेंत ; उंचावर . [ सं . उच्च ] वि. ( कुण . ) उच . भुईपासून किंवा उभें राहण्याच्या स्थानापासून आकाशांत पुष्कळ अंतरावर असणारा , पोंचणारा ; उन्नत ; उत्तुंग ; उच्च . चंद्रमंडळापेक्षां सूर्यमंडळ उंच आहे . श्रेष्ठ ( गुण , पदवी , किंमत यांमध्यें ); वरिष्ठ पदवीचा , योग्यतेचा ; ( चतुरस्त्रता , थोरपणा , वगैरेसंबंधानें ); सन्मान्य . चातुर्येवीण उंच पदवी । - दा १४ . ६ . ७ . उंचा , उंची पहा . ( संगीत ) वर चढणारा ( तान , स्वर , ) ऊर्ध्वगामी ; तीव्र ; वरपर्यंत गेलेला . फारच उभट चढणीचा . असं झालंया , कैलासावानी उच पहाडाच्या डोक्यावर पुरुस बसल्याती व्हयना ? - बाय २ . २ . ( राजा ) खोल ( विहीर , खांच , चर वगैरे ). फार मौल्यवान ; किंमतवान . कष्ट करितां सेत पिकें । उंच वस्त तत्काळ पिकें । - दा १२ . ७ . २५ . [ सं . उच्च . हीब्रु उच्दन = टेंकडी ; फ्रें . जि . बुच . ] ०कपाळ्या वि. नशीबवान . ०टाचा वागणें - अमंगल , अपवित्र पदार्थांवर पाऊल न पडावें म्हणून चवड्यावर चालणें . ( ल . ) गर्वानें वागणें ; तोर्यांत असणें . करुन वागणें - अमंगल , अपवित्र पदार्थांवर पाऊल न पडावें म्हणून चवड्यावर चालणें . ( ल . ) गर्वानें वागणें ; तोर्यांत असणें . ०दरवाजा पु. पुढील दरवाजा . उठल्या अबाई उंच दरवाजा लाविला । - ऐपो ६८ . ०दर्पण न. सूर्यकांत . उंच दर्पणीं अग्नी निघतो । - दा १६ . ५ . १९ . ०नाक प्रतिष्ठा ; मान्यता ; प्रौढी . उंच नाकें श्वशुरागारीं । वागे न ऐसें करावें ॥ - जै १७ . ६५ . ०नाक - क्रिवि . करुन - क्रिवि . प्रतिष्ठेनें ; मान्यतेनें . निर्लज्जपणानें ; बेशरमपणानें . ०नीच क्रिवि . खाली वर असें ; खडबडीत ; उंचसखल ; उत्तमाधम . लहान - थोर ; गरीबश्रीमंत . उंच नीच कांहीं नेणें भगवंत । - तुगा ३६९१ . ०पट न. चढण असलेला रस्ता ; चढणीवरील जागा . - वि . किंचित वर ; थोडें उंचावर . म्ह० सात ताड उंच = अतिशय उंच .
|