|
स्त्री. ( संगीत ) गायन शास्त्रांतील एक रागिणी . या रागांत षडज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत गांधार व निषाद वर्ज्य . जाती औडुव संपूर्ण , वादी धैवत व संवादी गांधार . गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर . [ सं . ? ] ०थाट पु. ज्यामधून आसावरी वगैरे राग उत्पन्न होतात त्या थाटाचें नांव . याचे सात स्वर पुढीलप्रमाणें असतात - शुध्द षडज , शुध्द ऋषभ , कोमल गांधार , शुध्द मध्यम , शुध्द पंचम , कोमल धैवत , कोमल निषाद .
|