|
न. ( महानु .) एक , सहा , दहा महिने मुकाम . महा अवस्थान - न . एक ते बारा वर्षे मुकाम . न. न. ( नृत्य ) एकाबाजूकडील कटी , पार्श्वभाग व जंघा किंचित उन्नत करणें , एक हात लताख्य करणें , दुसरा हात नितंबाचे बाजूस सोडणें , उजवा पाय किंचित तिरकस व डावा पाय मागें ओढून सम ठेवणें . पतीची वाट पहाणें , लीला , विलास वगैरे भाव दर्शित करण्याच्यावेळीं अशा स्थानाचा अंगीकार करितात . [ सं . ] राहण्याची जागा , ठिकाण ; वसतिस्थान ; वास . राहाण्याची , असण्याची रीत . पदार्थांची स्थिति ; पद . अस्तित्व ; वसती ; गुप्तवास . न करितां मंथन । काष्ठीं अवस्थान । जैसे कां हुताशन सामर्थ्याचें । - अमृ ७ . ५९ . [ सं . अव + स्था ]
|