Dictionaries | References

अंबट

   
Script: Devanagari

अंबट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sour or acid.
ambaṭa f A scandent shrub, Embellia tetandra or Basaal. Grah.

अंबट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sour, acid. Disappointed, dissatisfied. Cheerless, glum, sour.
अंबट ओलालें   Rather damp or moist.

अंबट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आंबट

अंबट     

वि.  १ आंबट ; खट्ठा ; आम्ल ; चवीला , वासाला हिरवा आंबा , चिंच , लिंब यांच्यासारखा . २ ( ल .) निरुत्साही ; वाईट ; खिन्न . ( सं . अम्ल ; प्रा . अंब ; अम्लवत् अम्ल = आंब + त ( लघुत्वदर्शक ))' अंबटतोंड '
 स्त्री. एक वनस्पति . ( इं .) एंबेलिया तेतान्द्रा .
०करणें   ( ल .) निराश करणें ; होणें .
०होणें   होऊन येणें पडणें - निराश होणें ; हताश होणें .
०मागणें   दुसर्‍याचें भांडण स्वतःवर ओढून घेणें .
०ओलें वि.  अर्धवट ओलसर ; दमट ; किंचित ओलें .
०चिंबत   अंबट द्वि . अंबट तेलकट इ० अपथ्यकारक ; विवक्षित मधुरपणा नसलेला .
०ढाण   ढास -( वि .) अंबत डहन ; अतिशय अंबत ( ताक , दही , चिंच इ० ); ठसका लागण्याइतके आंबट .( अंबट + ढाण , ढस = अतिशयार्थी ( ध्वनिवाचक ) सं . ध्वनित ; प्रा . ढणिय )
०तोंड  न. निराश ; खिन्नमुद्रा . ( क्रि०करणे ; होणें ). ' महात्मा गांधीच्या स्वातंत्र्यकूचाच्या बातम्या ... नोकरशाहीला आंबट तोंड करुन वाचाव्या लागतात .' - केसरी २५ . ३ . ३
०निंबू  न. कागदी लिंबू
०मिर्साग   ( लावप )-( गो .) १ तिखटमीठ लावणें . २ बहारीनें वर्णन करणें . ' तॉ नॅलें कितेंय सांगता तें आंबट मिर्सींग लावून सांगप '
०वणी  न. ( निंदायुक्त ) अंबट पाणी ; आमटी . ( अंबट + वन = पाणी )
०वाणा वि.  १ अतिशय अंबत २ ( ल .) निराश केलेला ; खट्ट ; रुसलेला ; खिजलेला . ( अंबट + वर्ण )
०वेल  स्त्री. अंबोशीची वेल ; हिचा रस अंबट असतो . वेलाचा रंग पांढरा , पानें जाड , असतात ही सारक व अग्निदीपक आहे ; कडमडवेल . - शे ६ . २६ . ( सं . आम्लपर्णी ; अंबष्टवल्ली ).
०शोक  पु. नसती आवड ; भलतीच चैन . ' त्याचा उद्योग म्हणजे निव्वळ आंबत शोक ' - तोबं २२१ .
०शोकी वि.  भलतीच चैन करणारा . ' राजेश्री मोठे आंबटशोकी खरे .'
०वरण   न चिंचगुळाचें , फोडणीचें पातळ वरण ( साध्या वरणाच्या उलट ); मंदोसरी . ' या नाटकांत सार कळेना का अंबट वरण कळेना !' - नाकु ३ . ७
००पण  न. ( व .) चिंच आमसुल वगैरे अंबट पदार्थ . ' वरनांत आंबटपण टाक '
०सर वि.  थोडेंसे अंबट ( ताक वगैर ). वईवरुन अंबट होणें - थोडक्यासाठीं रागावून मनुष्यास तोडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP