-
वि. १ मोठें ; प्रचंड . २ भयंकर ; भयानक ; भयकारक स्वरूपाचा . विकट देऊनियां हांक । वेगीं सन्मुख लोटला । - एरुस्व १२ . १३३ . २ छिन्न ; मोडलेला . तोचि सहस्त्रार्जुन साचार । विकटबाहो । - कथा ३ . १७ . १९ . - दावि २९३ . ३ हिडीस स्वरूपाचें ; कुरूप . पूजिती विकट दोंद । पशु सोंड गजाची । - तुगा ४१६ ; - ज्ञा ११ . १३९ . ४ विरुध्द ; विचित्र ; अघटित . क्षीराब्धीं काळकूट । हें येकि परीचें विकट । - अमृ ७ . २८६ . ५ ( गो . ) अशुभ ; अमंगल ( बोलणें , करणें , ऐकणें ). ६ कंटाळवाणें . सारखें सुख मनुष्यास विकट वाटतें . -( लोहोकरेकृत ) विसांवा पृ . ४४ . [ सं . ] विकटांत अध्ययन , विकटोपर्यंत अध्ययन , ज्ञान - न . १ देवपूजेच्या आरंभींचा सूमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्नराजो गणाधिपः । हा श्लोक सुध्दां विकटो पर्यंतच म्हणजे अर्धवट येणें . २ ( ल . ) अगदींच थोडें , अपुरें अध्ययन , ज्ञान ; ठोंबेपणा . धार्मिक व सामाजिक विषयासंबंधानें आमच्या लोकांचें ज्ञान विकटोपर्यंत जाऊन थडकलें होतें . - आगरकर . विकटोपशास्त्री - वि . मठ्ठ ; दगड ; ठोंब्या ( विद्यार्थी , माणूस ).
-
वि. भयंकर , भयानक , भीषण , भेसूर ;
-
वि. प्रचंड मोठा ;
-
वि. कुरुप , बेढब , विद्रुप , हिडीस .
Site Search
Input language: