|
पु. न . पु. ( सुतारी ) लांकूड साफ करण्याचा मोठा रंधा . [ दर = भेग ? ] धुळीचा कण ; धूळ . नकुळ रजाहीं मळवुनि सर्वांगाला वनासि गेला हो । - मोसभा ७ . ६३ . फुलांतील परागाचा कण ; सोनें इ० चा एक बारीक कण . मनुष्याचे जे तीन गुण ( सत्त्व , रज , तम ) त्यांतील दुसरा . स्त्रियांचा मासिक विटाळ . घांसून साफ करावयाची पूड . आरिसयालागीं सांचावें । अधिकें रज । - माज्ञा १८ . १४० . [ सं . ] ( वाप्र . ) रजाचा गज करणें - राईचा डोंगर करणें ; अतिशयोक्ति करणें ; थोड्याचें जास्ती करणें ; एकाचे दहा करणें ; अगदीं क्षुल्लक वस्तूला अतोनात महत्त्व देणें ; ज्यांत कांहीं अर्थ नाहीं अशा गोष्टी फुगवून सांगणें ; पराचा कावळा करणें . पुष्कळ काळ पोसणें व चांगला वाढीला लावणें ; लहानाचें मोठें करणें . रजःकण - पु . धुळीचा कण , बिंदु . [ रज + कण ] रजरेण - पु . धुळीचा कण . [ रज + रेणु ] रजोगुण - पु . सत्त्व , रज , तम , या तीन गुणांपैकीं दुसरा ; कामक्रोधादि मनोविकार या गुणाच्या प्राबल्यानें उत्पन्न होतात . [ सं . ] रजोगुणी - वि . ज्यामध्यें रजोगुण पुष्कळ व प्रधान आहेत तो ; विकारी ; विषयी ; कामुक . [ सं . ] रजोदर्शन - न . ऋतुदर्शन ; ऋतुप्राप्ति ; न्हाण ; अगदीं पहिलें विटाळशीपण . [ सं . ] रजस्वला - वि . स्त्री . विटाळशी ; ऋतुमती स्त्री ; ऋतुस्नात ; अस्पर्श स्त्री . पहिल्या दिवशी चांडाली , दुसर्या दिवशीं ब्रह्मघातिनी , तिसर्या दिवशीं रजकी समजतात . कृष्णा म्हणे सभेंत न न्यावें मज , मी रजस्वला आंगा । - मोसमा ५ . ५ . [ सं . ] रजी - स्त्री . धूळ ; धुराळा . [ रज ]
|