|
न. मूत्र ; लघवी ; जननेंद्रियांतून शरीरांतील बाहेर येणारें खारट पाणी . [ सं . मूत्र ; आमें जि . मुरेल ; यूरोपियनजि . मुतेर ] ०आणणें ( एखाद्यास ) अत्यंत त्रास देणें ; सतावणें . भिवविणें ; भीति घालणें . ०जळप ( गो . ) एखाद्याला मोठी योग्यता येणें . मुतमुतगावली करणें पुष्कळ मनधरणीच्या आणि नरमाईच्या गोष्टी करणें ; अत्यंत लाघवानें दुसर्याचें मन वळविणें . मूत येणें , होणें फार भयभीत होणें ; अत्यंत कष्टी , त्रस्त होणें ; कष्टामुळें जर्जर होणें . मुतांत माशा मारणें , मुतांत मासोळ्या मारणें - ( ल . ) आळसानें वेळ घालविणें ; निरुद्योगीपणांत काळ घालविणें . मुतानें दिवा पाजळणें , लावणें - अत्यंत निर्दय असणें ; कठोर - पणानें वागणें ; जुलमी असणें . मुतखडा - पु . ज्यामुळें लघवीला अडथळा होतो असा एक रोग ; अश्मरी . ज्या वेळीं वायु बस्तीमधील शुक्रमिश्रित मूत्राला अगर , कैफाला शुष्क करतो त्या वेळीं , गाईचें पित्त शुष्क झाल्यामुळें जसा गोरोचनाचा खडा बनतो त्याप्रमाणेंच अनुक्रमें शुक्रजन्य पित्तजन्य आणि कफजन्य मूतखडा बनतो . - योर २ . १३७ . मुतट - स्त्रीन . मूत्राशयाची पिशवी , आधान ; द्रव पदार्थाचें आशय . ( क्रि० येणें ; पडणें ; निघणें ; फुटणें ). - वि . मुताची घाण येणारें , मुतानें घाण झालेलें ( वस्त्र , जागा इ० ). मुतासारखी ( घाण ); मुतासारखा ( वास ). मुतणें - न . मासे व साप यांचें मूत्रेंद्रिय . - अक्रि . लघवी करणें ; मूत्रत्याग करणें ; मूत्रविसर्जन करणें . उभ्यानें किंवा फेर घेऊन मुतणें - ( ल . ) अत्यंत लज्जास्पद गोष्टी करणें . लाज सोडणें . मुतरा , मुत्रा - वि . वारंवार मुतणारा ; फार मुतणारा . ( ल . ) गळका ; भोंक असलेला . मुतरी , त्री - स्त्री . मुतण्याची जागा , मोरी . लहान झरा ; लहान प्रवाह . मुतवणी - न . मूत ; लघवी . ( ल . ) उबट पाणी ; कोमट द्रव पदार्थ . [ मूत + पाणी ] मूतसळई - स्त्री . मूत कोंडलें असतां तें काढण्यासाठीं मूत्रेंद्रियांत घालण्याची शस्त्रवैद्याची सळई . [ सं . मूत्रशलाका ] मुताची गांठोडी - स्त्री . मूत्रावरोध झाला असतां येणारा बस्तीच्या भागांतील फुगीरपणा आणि कठिणपणा . मुताट - स्त्री . तबेल्यांत घोडा बांधण्याच्या जागीं त्याचें मूत निघून जाण्यासाठीं ठेवलेलें , भोंक , मार्ग . [ मूत + ठाय ] मुताटणें - न मूत्रद्वार ; मूत्रमार्ग . - अक्रि . मूत्रप्रतिरोधाने पीडित होणें . [ मूत + ताठणें ] मुतारी - स्त्री . मुतरी अर्थ १ पहा . मुती , मुतु - स्त्री . ( बालभाषा ). लघवी ; मुतणें . मुतीर , रें - न . ज्यावर लहान मुलें मुतलेलीं आहेत असें , मुतानें भिजलेंलें , घाण झालेलें वस्त्र .
|